Electricity Bill Rises Live Update  Dainik Gomantak
अर्थविश्व

Electricity Bill: वीज बिलात प्रति युनिट हेणार इतकी वाढ, केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले मोठे कारण

महागाईमध्ये वीज बिलाचे नाव देखील जोडले जाऊ शकते, केंद्रीय मंत्र्यांची मोठी घोषणा

दैनिक गोमन्तक

Power Bill: देशातील लोकांना महागाईचे झटके सतत जाणवत आहेत.अशातच या महागाईमध्ये वीज बिलाचे नाव देखील जोडले जाऊ शकते. आता आपली वीज बिले वाढू शकतात यासाठी जनतेने तयार राहावे, असे केंद्रीय ऊर्जामंत्र्यांनी सांगितले. मात्र, केंद्रीय मंत्र्याकडून प्रति युनिट वीज बिलात एक रुपयापेक्षा कमी वाढ झाल्याचे बोलले जात आहे. (Power ministry announcement live updates)

वीज शुल्क प्रति युनिट 60-70 पैशांनी वाढेल- केंद्रीय मंत्री आरके सिंह (R. K. Singh)

केंद्रीय ऊर्जा मंत्री(Ministry of Power) आरके सिंह म्हणाले की, वीजनिर्मिती केंद्रांना ब्लॅकआउट टाळण्यासाठी 10 टक्के आयात कोळसा मिसळण्यास सांगितले आहे. यामुळे वीज शुल्कात प्रति युनिट 60-70 पैशांनी वाढ होणार आहे. देशांतर्गत कोळशाचा पुरवठा वीज कंपन्यांची मागणी पूर्ण करू शकत नसल्याने वीज टंचाई टाळण्यासाठी हे करावे लागत असल्याचे आर के सिंग यांनी सांगितले.

विजेच्या वापरात 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे

ऊर्जामंत्र्यांनी सांगितले की, "विजेच्या वापरात सुमारे 25 टक्क्यांनी वाढ झाली असून, गेल्या वर्षभरात कमाल मागणीही 15 टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे देशांतर्गत कोळसा उत्पादन पुरेसे नसल्यामुळे ब्लॅकआउट टाळण्यासाठी आम्ही वीज प्रकल्पांना 10 टक्के आयातित कोळसा मिसळण्यास सांगितले आहे.आयातित कोळशाची किंमत 17,000-18,000 रुपये प्रति टन आहे, तर देशांतर्गत कोळशाची किंमत 2,000 रुपये प्रति टन आहे. त्यामुळे वीज शुल्क प्रति युनिट सुमारे 60-70 पैशांनी वाढेल."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT