Farmer Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Kisan: नवीन वर्षात 12 कोटी शेतकऱ्यांना मिळणार मोठी भेट, PM मोदींनी केली घोषणा; जाणून घ्या

PM Kisan Samman Nidhi Scheme: पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan Samman Nidhi Scheme) 13 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहिली जात आहे.

दैनिक गोमन्तक

PM Kisan 13th Instalment Latest News: देशातील करोडो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नवीन वर्षात पंतप्रधान मोदी 12 कोटी शेतकऱ्यांना (PM Kisan) मोठी भेट देणार आहेत. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan Samman Nidhi Scheme) 13 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. दरम्यान, तारखेची घोषणा करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, जानेवारी महिन्यातच करोडो लोकांच्या खात्यात 2000 रुपयांचा 13 वा हप्ता हस्तांतरित केला जाईल.

पंतप्रधान मोदींनी तारीख जाहीर केली

माहिती देताना पीएम मोदी म्हणाले की, हे पैसे 26 जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांच्या (Farmer) खात्यात ट्रान्सफर केले जाऊ शकतात, सध्या तारीख निश्चित नाही, मात्र जानेवारी महिन्यात शेतकऱ्यांना या पैशाचा लाभ मिळेल अशी अपेक्षा आहे. सरकारने आतापर्यंत 12 हप्त्यांचे पैसे ट्रान्सफर केले आहेत.

12 कोटीहून अधिक शेतकरी लाभ घेत आहेत

आत्तापर्यंत 8.42 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना 12 हप्त्यांचा लाभ मिळाला आहे. सध्या देशभरातील 12 कोटींहून अधिक शेतकरी या सरकारी योजनेचा लाभ घेत आहेत.

गेल्या वर्षी 1 जानेवारीला पैसे ट्रान्सफर झाले

दुसरीकडे, 1 जानेवारी 2022 रोजी पीएम मोदींनी दुपारी 12:30 वाजता शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले. गेल्या वर्षी पीएम मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पैसे ट्रान्सफर केले होते. या अंतर्गत सुमारे 10 कोटी शेतकऱ्यांना 20,000 कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित करण्यात आली.

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत सरकार (Government) शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपयांची आर्थिक मदत करते. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारने ही योजना सुरु केली आहे. या माध्यमातून कोट्यवधी शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT