PM Kisan Scheme Latest News Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Kisan: करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मोदी सरकार देणार हा मोठा फायदा

PM Kisan Nidhi: पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 12व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत कोट्यवधी शेतकरी आहेत.

दैनिक गोमन्तक

PM Kisan Yojana: पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 12 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत कोट्यवधी शेतकरी आहेत. तुम्हीही हप्त्याची वाट पाहत असाल तर ही बातमी तुम्हाला दिलासा देईल. केंद्र सरकारच्या वतीने देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना 12 व्या हप्त्यापूर्वी (pm kisan 12th Installment) मोठा लाभ दिला जात आहे. जर तुम्ही अद्याप त्याचा लाभ घेतला नसेल तर आजच जाणून घ्या तुम्ही त्याचा फायदा कसा घेऊ शकता?

स्वस्त कर्ज मिळणे सोपे होईल

सरकारच्या (Government) वतीने पीएम किसान सन्मान निधीच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना 'किसान क्रेडिट कार्ड' (KCC) ची सुविधा दिली जात आहे. जर तुम्ही त्यासाठी अर्ज केला नसेल तर लवकरात लवकर अर्ज करा. याद्वारे तुम्हाला स्वस्त कर्ज सहज मिळू शकेल. ज्याद्वारे तुम्ही कोणताही व्यवसाय सुरु करु शकता. वास्तविक शेतकऱ्यांचे (Farmers) उत्पन्न वाढवणे हा सरकारचा उद्देश आहे.

अर्ज कसा करायचा

तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड (KCC) बनवायचे असेल, तर तुम्ही बँकेच्या जवळच्या शाखेत जाऊन अर्ज करु शकता. तुम्हाला आवश्यक कागदपत्रे जमा करण्यासोबतच अर्ज भरावा लागेल. फॉर्म भरल्यानंतर संबंधित बँक (Bank) अधिकाऱ्याला आवश्यक ती सर्व कागदपत्रे द्यावी लागतील. किसान क्रेडिट कार्ड (KCC) साठी अर्ज करण्यासाठी, 2 पासपोर्ट साइज फोटो, आधार कार्ड (Aadhar Card) इत्यादी कागदपत्रे आवश्यक असतील. याशिवाय पेरणी केलेल्या पिकांचीही माहिती द्यावी लागणार आहे.

व्याजावरील सबसिडीचा लाभ

किसान क्रेडिट कार्डवर, शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचे अल्प मुदतीचे कर्ज पाच वर्षांच्या कालावधीसाठी दिले जाते. किसान क्रेडिट कार्डवर घेतलेल्या पैशावर सरकारकडून अनुदान दिले जाते, ज्यामुळे तुम्हाला त्यावर कमी व्याज द्यावे लागते.

पीएम किसानच्या खात्यात पैसे कधी येणार?

पीएम किसान योजनेच्या 12 व्या हप्त्याचे पैसे अद्याप शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. यापूर्वी 2 ऑक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पोहोचणे अपेक्षित होते. या वेळी प्रत्यक्ष पडताळणीमुळे 12 वा हप्ता मिळण्यास विलंब होत आहे. पण ऑक्टोबरमध्ये दिवाळीच्या आधी कोणत्याही दिवशी हा हप्ता मिळण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या या योजनेत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये दिले जातात, जे प्रत्येकी 2-2 हजाराच्या तीन हप्त्यांमध्ये दिले जातात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT