PM Kisan  Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Kisan: आता पती-पत्नी दोघांनाही PM किसान योजनेंतर्गत मिळणार 6000 रुपये! जाणून घ्या

PM Kisan Samman Nidhi Update: पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात वार्षिक 6000 रुपये म्हणजेच 2000 रुपये असे तीन हप्ते पाठवते.

दैनिक गोमन्तक

PM Kisan Samman Nidhi Update: पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात वार्षिक 6000 रुपये म्हणजेच 2000 रुपये असे तीन हप्ते पाठवते. पण, आतापर्यंत या योजनेत अनेक बदल झाले आहेत. कधी अर्जाबाबत तर कधी पात्रतेबाबत. दुसरीकडे, योजनेबाबत अनेक नवे नियम बनवले जात आहेत. आता या योजनेत पती-पत्नी दोघांनाही पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळण्याबाबत बोलले जात आहे. त्याचे नियम जाणून घेऊया...

जाणून घ्या कोणाला मिळणार फायदा?

पीएम किसान योजनेच्या नियमांनुसार पती आणि पत्नी दोघेही पीएम किसान सन्मान निधी योजनेचा (पीएम किसान लाभ) लाभ घेऊ शकत नाहीत. जर कोणी असे केले तर त्याला खोटे ठरवून सरकार त्याच्याकडून वसुली करेल. याशिवाय, अपात्र ठरणाऱ्या अशा अनेक तरतुदी योजनेमध्ये आहेत. अपात्र शेतकऱ्यांनी (Farmers) या योजनेचा लाभ घेतल्यास त्यांना सर्व हप्ते सरकारला परत करावे लागतील. या योजनेच्या नियमांतर्गत शेतकरी कुटुंबात कोणी कर भरल्यास या योजनेचा लाभ मिळणार नाही. म्हणजेच, पती-पत्नीपैकी एकाने गेल्या वर्षी आयकर भरला असेल, तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

त्यांनाही लाभ मिळणार नाही

जर कोणी शेतजमिनीचा मालक असेल, परंतु तो सरकारी कर्मचारी असेल किंवा सेवानिवृत्त, विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार (MLA), मंत्री असेल तर असे लोक किसान योजनेच्या लाभासाठी देखील अपात्र आहेत. व्यावसायिक नोंदणीकृत डॉक्टर (Doctor), अभियंता, वकील, चार्टर्ड अकाउंटंट किंवा त्यांचे कुटुंबीयही अपात्रांच्या यादीत येतात. आयकर भरणाऱ्या कुटुंबांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT