Farmer Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Kisan Scheme: शेतकऱ्यांचे बल्ले-बल्ले, 2000 ऐवजी खात्यात येणार एवढी मोठी रक्कम!

PM Kisan Scheme: पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना आता दुप्पट लाभ मिळणार आहे.

Manish Jadhav

PM Kisan Scheme Latest News: केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना आता दुप्पट लाभ मिळणार आहे.

यापूर्वी सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये ट्रान्सफर करत असे, पण आता तुम्हाला पूर्ण 4000 रुपये मिळतील. होय... तुम्हीही शेतकरी असाल तर तुम्हाला दुप्पट पैसे मिळतील.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत सरकार शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपयांची आर्थिक मदत देते. देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकारकडून हा पैसा हस्तांतरित केला जातो.

13व्या हप्त्यातही पैसे मिळतील

अनेक शेतकरी त्यांच्या पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करु शकले नाहीत, त्यामुळे त्या शेतकऱ्यांना 13 व्या हप्त्याचे पैसे मिळाले नाहीत, परंतु आता मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी पडताळणी केली आहे.

आता 14 व्या हप्त्यावर सरकार (Government) 2000 रुपयांऐवजी 4000 रुपये शेतकऱ्यांना हस्तांतरित करणार आहे. यामध्ये ज्या शेतकऱ्यांना तेराव्या हप्त्याचे पैसे मिळाले नाहीत. त्या शेतकऱ्यांना तेराव्या हप्त्याचे पैसेही मिळतील.

13 हप्त्यांचे पैसे हस्तांतरित केले आहेत

केंद्र सरकारकडून आतापर्यंत 13 हप्त्यांचे पैसे शेतकऱ्यांच्या (Farmers) खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. सध्या शेतकरी चौदाव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. ज्या शेतकऱ्यांना 13 व्या हप्त्याचे पैसे मिळालेले नाहीत, त्यांना 13 व्या आणि 14 व्या हप्त्याचे पैसे मिळतील.

14 वा हप्ता कधी येऊ शकतो

पीएम किसान सन्मान निधीचा 14 वा हप्ता एप्रिल ते जुलै दरम्यान रिलीज होणार आहे. मागील वर्षी, याच कालावधीत मिळालेला 11 वा हप्ता 31 मे 2022 ला हस्तांतरित करण्यात आला होता. मात्र यावेळी खात्यात 14 वा हप्ता लवकरच येण्याची शक्यता आहे.

पीएम किसानशी संबंधित येथे तक्रार करा

जर 13व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात अद्याप आले नाहीत, तर तुम्ही हेल्पलाइन क्रमांक 155261 किंवा 1800115526 किंवा 011-23381092 या क्रमांकावर संपर्क साधू शकता. याशिवाय pmkisan-ict@gov.in या ईमेल आयडीवर मेल करुनही तुम्ही तुमची समस्या सांगू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT