Prime Minister Narendra Modi  Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Kisan: शेतकऱ्यांसाठी खूशखबर, मोदी सरकार देतेय 18 लाख रुपये; थेट खात्यात येणार पैसे!

PM Kisan FPO Scheme 2023: शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्हीही शेतकरी असाल तर आता तुम्हाला केंद्र सरकारकडून 18 लाख रुपये मिळतील.

Manish Jadhav

PM Kisan FPO Scheme 2023: शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्हीही शेतकरी असाल तर आता तुम्हाला केंद्र सरकारकडून 18 लाख रुपये मिळतील. होय... शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकार विविध योजना राबवत आहे.

देशभरातील कोट्यवधी शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहेत, ज्या अंतर्गत सरकार दरवर्षी 6000 रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करत आहे.

आता शेतकऱ्यांना लाखोंचा लाभ मिळणार आहे. सरकार कोणत्या योजनेअंतर्गत 18 लाख रुपयांची आर्थिक मदत देत आहे, ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

हे पैसे कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत

पीएम किसान एफपीओ योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित व्यवसाय सुरु करण्यासाठी 18 लाख रुपयांची आर्थिक मदत करते.

मात्र, यासाठी शेतकऱ्यांना किमान 11 शेतकरी असलेल्या संघटनेत सहभागी व्हावे लागेल. यासोबतच खते, बियाणे, रसायने आणि कृषी यंत्रसामग्री यांसारख्या जीवनावश्यक वस्तू स्वस्त दरात खरेदी करण्यासाठी सरकार शेतकऱ्यांना मदत करते.

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल

या योजनेंतर्गत बँकांकडून (Bank) स्वस्त दरात कर्जाचा लाभही शेतकरी घेऊ शकतात. शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी मोदी सरकारने 'पीएम किसान एफपीओ योजना' योजना सुरु केली आहे.

या योजनेंतर्गत शेतकरी उत्पादक संघटनेला 18 लाख रुपये दिले जातील. देशभरातील शेतकऱ्यांना नवीन शेती व्यवसाय सुरु करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाईल.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी 11 शेतकर्‍यांना (Farmer) मिळून एक संघटना स्थापन करावी लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीची साधने किंवा खते, बी-बियाणे किंवा औषधे खरेदी करणेही सोपे होणार आहे.

अर्ज कसा करता येईल-

>> सर्वप्रथम तुम्हाला नॅशनल अॅग्रिकल्चर मार्केटच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.

>> होम पेजवर दिलेल्या FPO च्या पर्यायावर क्लिक करा.

>> येथे 'Registration' या पर्यायावर क्लिक करा आणि तुमच्यासमोर फॉर्म उघडेल.

>> फॉर्ममध्ये मागितलेली सर्व माहिती काळजीपूर्वक एंटर करा.

>> यानंतर पासबुक किंवा रद्द केलेला चेक किंवा आयडी स्कॅन करून अपलोड करा.

>> शेवटी सबमिट पर्यायावर क्लिक करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shukra Gochar 2026: शुक्राचे आर्द्रा नक्षत्रात गोचर! 5 भाग्यवान राशींवर होणार पैशांचा पाऊस आणि सुखवृद्धी; लव्ह लाइफसाठी सुवर्णकाळ

Goa Bison Car Accident: गोव्यात धावत्या कारला गवा रेड्याची जोरदार धडक, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली; चालक थोडक्यात बचावला!

VIDEO: "याच्या ओव्हरअ‍ॅक्टिंगचे 50 पैसे कापा" मोहम्मद रिझवान अन् लिटन दास यांच्यात जोरदार बाचाबाची; बांगलादेशी खेळाडूंनी उडवली खिल्ली

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाच्या चर्चेदरम्यान मोदी सरकारचा मोठा निर्णय, 'या' सरकारी कर्मचाऱ्यांची लागली लॉटरी; ओल्ड पेन्शन स्कीमचा मिळणार फायदा

Horoscope 20 May 2026: चंद्राचे गोचर घडवणार चमत्कार! बुधवारचा दिवस 5 राशींसाठी भाग्याचा; व्यवसायातून होणार अफाट धनलाभ

SCROLL FOR NEXT