Framer  Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Kisan Samman Nidhi: 'या' राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा फटका, 13 वा हप्ता...!

PM Kisan Samman Nidhi: पीएम किसान सन्मान निधीच्या 13व्या हप्त्याबाबत शेतकऱ्यांची प्रतीक्षा वाढत चालली आहे.

दैनिक गोमन्तक

PM Kisan Samman Nidhi: पीएम किसान सन्मान निधीच्या 13व्या हप्त्याबाबत शेतकऱ्यांची प्रतीक्षा वाढत चालली आहे. यापूर्वी हा हप्ता 26 जानेवारीपासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणे अपेक्षित होते. पण आता नवी तारीख समोर येत आहे.

वास्तविक, पीएम किसानच्या अपात्र लाभार्थ्यांच्या विरोधात सरकारकडून मोहीम चालवली जात आहे. शासनाकडून अपात्र शेतकऱ्यांची (Framer) नावे यादीतून वगळण्यात येत आहेत. या कारणास्तव, यावेळी पीएम किसानचा 13 वा हप्ता मिळण्यास विलंब होत आहे.

2.41 कोटी शेतकऱ्यांना 11 वा हप्ता मिळाला

सरकारकडून (Government) यादीतून नावे हटवण्याचे कारण म्हणजे ई-केवायसी, भुलेख पडताळणी न करणे आणि बँक खाते आधारशी लिंक न करणे. जनजागृतीसाठी सरकारकडून गावोगावी ई-केवायसी शिबिरेही घेतली जात आहेत. यूपीमध्ये 2.41 कोटी शेतकऱ्यांना 11वा हप्ता मिळाला, 12व्या हप्त्यात ही संख्या घटून 1.7 कोटी झाली. आता 13 व्या हप्त्यापूर्वीच 33 लाख शेतकऱ्यांची नावे वगळल्याची माहिती समोर येत आहे.

येथे 7 लाख शेतकऱ्यांसाठी e-kyc शिल्लक आहे

गोरखपूर आणि बस्ती विभागात जास्तीत जास्त 7 लाख शेतकऱ्यांकडे ई-केवायसी करणे बाकी आहे. या संदर्भात कृषी सहसंचालक राकेश बाबू सांगतात की, ज्या पात्र शेतकऱ्यांनी ई-केवायसी केले नाही ते 13 व्या हप्त्यापासून वंचित राहू शकतात. यावेळी 13वा हप्ता जानेवारीत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणे अपेक्षित आहे. तुम्ही अद्याप ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली नसेल, तर ती लवकरात लवकर पूर्ण करा.

यादीत तुमचे नाव तपासा

जर तुम्हाला 13 व्या हप्त्यासाठी तुमचे नाव तपासायचे असेल तर सर्वप्रथम पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर जा. येथे Former Corner वर क्लिक करा आणि नंतर लाभार्थी यादीत तुमचे नाव तपासा. तुमचे ई-केवायसी आणि जमिनीचे तपशील पूर्ण आहेत की, नाही ते येथे तपासा. जर तुमच्या स्टेटससमोर 'होय' लिहिले असेल तर तुमच्या खात्यात 13वा हप्ता येणार आहे. जर कोणाच्या समोर 'नाही' लिहिले असेल तर त्याला 13वा हप्ता मिळणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: व्हायरल होण्यासाठी काहीही? भर बाजारात तरूणीचा टॉवेलवर डान्स! नेटकरी भडकले

Goa Crime: सॅम्युअलचा बळी नक्की कोणामुळे?यंत्रणेवरच्या विश्‍वासाचा 'कचरा'!

Goa Water Crisis: चिखली-कोलवाळ परिसरात तीव्र पाणीटंचाई; ग्रामस्थ संतप्त, पाणीपुरवठा विभागाकडून नवीन जलवाहिनीचे काम सुरू

सॅम्युअलवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंकार, कुटुंबीयांनी अखेर मृतदेह स्वीकारला; पोलिसांच्या 'FIR'वर कार्लोस फेरेरा यांचे प्रश्नचिन्ह

Ujjwala Yojna New Rules: सर्वसामान्यांना मोठा धक्का! उज्ज्वला गॅस योजनेत मोठा बदल; आता वर्षभरात मिळणार फक्त 'इतके' सिलिंडर

SCROLL FOR NEXT