PM Kisan Yojana Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Kisan: होळीपूर्वीच करोडो शेतकर्‍यांचे बल्ले-बल्ले, सरकारने दिली अशी माहिती...!

Pm Kisan Scheme Status: तुम्हीही पंतप्रधान किसान सन्मान निधी (Pm Kisan Scheme) च्या 13 व्या हप्त्याची वाट पाहत असाल, तर आता तुमची प्रतीक्षा संपणार आहे.

Manish Jadhav

PM Kisan Scheme 13th Installment Date 2023: देशातील करोडो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. तुम्हीही पंतप्रधान किसान सन्मान निधी (Pm Kisan Scheme) च्या 13 व्या हप्त्याची वाट पाहत असाल, तर आता तुमची प्रतीक्षा संपणार आहे.

या हप्त्याचे पैसे मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहेत, म्हणजेच यावेळी सरकार 14 कोटी शेतकऱ्यांना होळीच्या दिवशी मोठी भेट देणार आहे. यासोबतच, शेतकऱ्यांच्या सुविधांसाठी केंद्र सरकारने (Central Government) आणखी एक नवीन उपक्रम सुरु केला आहे.

पैसे कधी येणार?

पीएम किसान सन्मान निधीचा 13 वा हप्ता 8 मार्च रोजी खात्यात येऊ शकतो, सध्या कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, परंतु मीडिया रिपोर्ट्सनुसार असे मानले जात आहे की, सरकार शेतकऱ्यांना (Farmers) मोठी भेट देणार आहे.

विमा योजनेच्या अधिकृत ट्विटवर माहिती मिळाली

यासोबतच, प्रधानमंत्री फसल विमा योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळणार आहे. अधिकृत वेबसाइटनुसार, आतापासून कोणत्याही शेतकऱ्याला भाषेच्या समस्येला सामोरे जावे लागणार नाही.

पीक विम्याच्या मार्गात शेतकऱ्यांना कोणतेही अडथळे येणार नाहीत, याची काळजी घेण्याची जबाबदारी प्रधानमंत्री फसल विमा योजना घेते. पीक विमा अॅप आणि एनसीआय पोर्टलवर शेतकरी हिंदी, इंग्रजीसह 12 प्रादेशिक भाषांमध्ये पीक विमा संबंधित माहिती मिळवू शकतात.

12 हप्ते जारी करण्यात आले आहेत

आत्तापर्यंत पीएम किसान योजनेचे 12 हप्ते जारी करण्यात आले आहेत. आता सर्व शेतकऱ्यांना तेराव्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत. अशा परिस्थितीत, जर तुम्ही अद्याप EKYC केले नसेल, तर ते त्वरित करा, अन्यथा 13 व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात येणार नाहीत.

तुमच्या हप्त्याचे स्टेटस तपासा-

>> हप्त्याचे स्टेटस पाहण्यासाठी तुम्ही पीएम किसानच्या वेबसाइटवर जा.

>> आता Farmers Corner वर क्लिक करा.

>> आता Beneficiary Status या पर्यायावर क्लिक करा.

>> आता तुमच्यासोबत एक नवीन पेज उघडेल.

>> येथे तुम्ही तुमचा आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक टाका.

>> यानंतर तुम्हाला तुमच्या स्टेटसची संपूर्ण माहिती मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT