PM Kisan Yojana Dainik Gomantak
अर्थविश्व

PM kisan Yojana: शेतकऱ्यासांठी गुडन्युज! कोट्यावधी शेतकऱ्यांना पीएम किसानचा तेरावा हप्ता मिळणार आजच

आज कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 13 वा हप्ता मिळणार आहे.

दैनिक गोमन्तक

देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात आज पीएम किसान सन्मान निधी योजनेचे 13 वा हप्ता जमा होणार आहे. त्यानुसार अंदाजे 2000 रुपये कोट्यवधी शेतकऱ्यांना मिळणार आहेत.

पीएम नरेंद्र मोदी (PM Modi) 27 फेब्रुवारीला पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे हस्तांरित करणार आहेत. पण यावेळी ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही. सरकराने पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना ई केवायसी अनिवार्य केले आहे.

  • शेतकऱ्यांनी आपले नाव कसे तपासावे

सगळ्यात आधी लाभार्थ्यांनी पीएम किसानच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.

वेबसाईटवर गेल्यानंतर फार्नर काॅर्नरवर जावे

फार्नर काॅर्नरमध्ये बेनिफिशिअरी लिस्ट दिसेल

तुमचे राज्य, जिल्हा, तालुका, ब्लाॅक आणि गाव असे एक एक पर्याय निवडावे

गेट रिपोर्टवर क्लिक करावे

तुमच्या स्क्रिनवर सर्व लाभार्थ्यांची लिस्ट दिसेल.

त्यात तुमचे नाव पाहता येईल.

  • पीएम किसान ई केवायची प्रक्रिया अशा प्रकारे करावी

पीएम किसानच्या संकेतस्थळावर भेट द्या.

आता फार्नर काॅर्नर ई केवायसी वर क्लिक करा

ओटीपी आधारित ई केवायसीचा पर्याय निवडा आणि त्यात तुमचा आधार क्रमांक लिहा

सर्च पर्याय क्लिक करा

तुमचा आधार नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर वन टाईम पासवर्ड मिळाल्यानतंर गेट ओटीपी वर क्लिक करा

नंतर ओटीपी टाकावा.

व्हेरिफिकेशन यशस्वी झाल्यानतंर ई केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल.

e-kyc आवश्यक

शेतकऱ्यांनाही e-kyc ची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. यासाठी पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in वर जाऊन e-kyc चा पर्याय निवडावा लागेल. यानंतर आधार क्रमांक आणि नोंदणीकृत मोबाइल क्रमांक टाकावा लागेल. मोबाईलवर आलेला ओटीपी सबमिट केल्यानंतर दुसरा आधार ओटीपी येईल. आधार ओटीपी टाकल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Bicholim Fish Market: गणपती विसर्जनानंतर मासळी मार्केट पुन्हा गजबजले; भाव ऐकून ग्राहकांच्या कपाळावर आठ्या, सुरमई 900 रुपये किलो

SCROLL FOR NEXT