Farmer Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Mandhan Yojana: पीएम किसानच्या हप्त्यानंतर शेतकऱ्यांसाठी खूशखबर, सरकारने दिली एवढ्या हजारांची भेट!

Pension Scheme For Farmers: केंद्रातील मोदी सरकार शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी विविध योजना राबवत आहे.

Manish Jadhav

Pension Scheme For Farmers: केंद्रातील मोदी सरकार शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी विविध योजना राबवत आहे. पीएम किसान सन्मान निधी ही केंद्राच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक आहे.

या योजनेंतर्गत PM मोदींनी 27 जुलै रोजी DBT द्वारे 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 2-2 हजार रुपये ट्रान्सफर केले.

देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेसोबत दरमहा 3000 रुपयांची भेटही मिळणार आहे. हे पैसेही शेतकऱ्यांच्या खात्यातच जमा होणार आहेत.

दरमहा 3000 रुपये खात्यात येतील

प्रधानमंत्री किसान मानधन योजना (PM Kisan Mandhan Yojana) देखील केंद्राने PM किसान योजनेसोबत सुरु केली आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते.

पीएम मानधन योजनेंतर्गत सरकार दरमहा 3000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करणार आहे. योजनेंतर्गत शेतकऱ्यांना (Farmer) मासिक तीन हजार रुपये पेन्शन देण्याची तरतूद आहे.

योजनेचा प्रीमियम किसान सन्मान निधी योजनेच्या रकमेतून कापला जातो. यासाठी तुम्हाला वेगळा फॉर्म भरावा लागेल.

किती प्रीमियम भरावा लागेल?

या पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना दरमहा 55 ते 200 रुपयांपर्यंत योगदान द्यावे लागेल. या योजनेअंतर्गत नोंदणी करणाऱ्या व्यक्तीचे वय 60 वर्षे होईल, त्यानंतर दरमहा 3000 रुपये पेन्शन खात्यात येऊ लागेल. 18 ते 40 वयोगटातील कोणतीही व्यक्ती यामध्ये सहभागी होऊ शकते.

योजनेचे फायदे

देशातील वृद्ध शेतकऱ्यांना पेन्शन (Pension) देण्यासाठी सरकारने ही योजना सुरु केली आहे. योजनेत शेतकऱ्यांना वर्षभरात 36 हजार रुपये दिले जातात. 40 वर्षापर्यंतचे शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. पेन्शन मिळवायची असेल तर वयानुसार प्रीमियम निश्चित केला जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Plastic Waste Management: बहुपदरी प्लास्टिक पॅकेजिंगवर आता 'डिपॉझिट रिफंड' अनिवार्य करा; गोवा सरकारची 'सीपीसीबी'कडे शिफारस

Asian Games 2026: हॅप्पी बर्थडे चॅम्पियन! लव्हलिना बोर्गोहेनने वाढदिवसाच्या दिवशी जिंकले ‘गोल्ड’; महिला बॉक्सिंगमध्ये भारताला 12 वर्षांनंतर सुवर्ण यश

Goa Water Conservation: गोव्यात पाणीटंचाईची चिंता नको; मे-जूनपर्यंत पुरेल साठा, फळदेसाईंचे पाणी जपून वापरण्याचे आवाहन

खरी कुजबुज: काब्रालचे भाजपला नथीतून बाण!

IND vs WI 3rd ODI: तिसऱ्या वनडेत मोठा बदल! रोहित शर्मा बाहेर, यशस्वी जयस्वालची एन्ट्री; पाहा टीम इंडियाची संभाव्य Playing-11

SCROLL FOR NEXT