Pradhan Mantri Awas Yojana Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Awas Yojana: PM आवास योजनेबाबत सरकारने केली मोठी घोषणा! ऐकून तुम्हीही म्हणाल...

PM Awas Yojana Update: तुम्ही PM हाऊसिंगचे लाभार्थी असाल तर ही बातमी नक्की वाचा.

दैनिक गोमन्तक

PM Awas Yojana: तुम्ही PM हाऊसिंगचे लाभार्थी असाल तर ही बातमी नक्की वाचा. पीएम आवास योजनेसंबंधी सरकारने मोठी घोषणा केली आहे. सरकारच्या या घोषणेनंतर तुम्हा सर्वांना मोठा फायदा होणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण (PMAY-G योजना) 2024 पर्यंत सुरु ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे.

पंतप्रधान आवास योजनेबाबत मोठी घोषणा

सरकारने पीएम आवास योजना- ग्रामीण अंतर्गत 2.95 कोटी पक्की घरे देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आतापर्यंत सुमारे 2 कोटी पक्की घरे बांधण्यात आली आहेत. मात्र अजूनही अशी अनेक कुटुंबे शिल्लक आहेत, हे लक्षात घेऊन 2024 पर्यंत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण सुरु ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. याचा फायदा लाखो ग्रामस्थांना होणार आहे.

सरकारने दिलेली माहिती

सरकारने (Government) दिलेल्या माहितीनुसार, या योजनेसाठी केंद्र सरकारचा एकूण खर्च 1,43,782 कोटी रुपये असेल आणि यामध्ये नाबार्डला (Nabard) कर्जाच्या व्याजासाठी 18,676 कोटी रुपयांचा समावेश आहे. खरे तर, या योजनेद्वारे, सरकार 90 टक्के आणि 10 टक्के या आधारावर पर्वतीय राज्यांना पैसे देते. तर उर्वरित 60 टक्के आणि 40 टक्के केंद्र आणि राज्ये देतात. तर केंद्रशासित प्रदेशात सरकार 100 टक्के पैसे खर्च करते.

शौचालय बांधण्यासाठी पैसे मिळवा

सरकार स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत शौचालय बांधकामासाठी 12,000 रुपये देते, जे इमारतीच्या बांधकामाव्यतिरिक्त दिले जाते. या योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबाला पक्के घर, पाणी, वीज, शौचालये देण्याचा शासनाचा संकल्प पूर्ण होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: सोयरिक तुटल्यात जमा! गोवा फॉरवर्डने 'गोवा फर्स्ट'चे होर्डिंग्ज काढले; आपसोबतच्या युतीवरून गोव्यात राजकीय चर्चांना उधाण

Horoscope 7 October 2026: गुंतवणुकीसाठी शुभ दिवस, बँक बॅलेन्समध्ये होणार तगडी वाढ! बुधवार ठरणार 'या' राशींसाठी गोल्डन डे

Goa Assembly Speech: संवादातूनच लोकहित शक्य! सत्ताधारी-विरोधकांनी जनप्रश्नांवर मार्ग काढावा; गोवा विधानसभा रौप्यमहोत्सवात ओम बिर्लांचा लोकप्रतिनिधींना संदेश

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

SCROLL FOR NEXT