Petrol Diesel Price hike today Dainik Gomantak
अर्थविश्व

गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर पुन्हा वाढले पेट्रोल-डिझेलचे दर

पाहा आज तुमच्या शहरात तेलाचे दर काय आहेत

दैनिक गोमन्तक

देशभरात पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे दर दिवसेंदिवस अनियंत्रित होत आहेत . पेट्रोल आणि डिझेल आज पुन्हा एकदा महाग झाले आहे. देशातील प्रमुख तेल विपणन कंपन्यांनी शनिवारी 2 एप्रिल रोजी पुन्हा तेलाच्या किमती वाढवल्या आहेत. देशाची राजधानी दिल्लीत (Delhi) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 80 पैशांनी तर मुंबईत 85 पैशांनी वाढ झाली आहे. नव्या दरवाढीनंतर दिल्लीत एक लिटर पेट्रोलचा दर 102.61 रुपये आणि डिझेलचा दर 93.87 रुपये प्रति लिटर झाला आहे. तर मुंबईत पेट्रोल 117.57 रुपये आणि डिझेल 101.79 रुपये प्रतिलिटर झाले आहे. (Petrol-Diesel Price Today)

चेन्नई आणि कोलकातामध्येही तेलाच्या किमती वाढल्या आहेत

दिल्ली आणि मुंबईशिवाय चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 76 पैशांनी, कोलकातामध्ये 84 पैशांनी आणि डिझेलच्या दरात 80 पैशांनी वाढ झाली आहे. आज कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यानंतर चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 108.21 रुपये आणि कोलकातामध्ये 112.19 रुपये प्रति लिटर झाला आहे. आज कोलकात्यात डिझेलची किंमत 97.02 रुपये प्रति लिटर आहे.

दरम्यान गोव्यात एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ व्यावसायिक एलपीजीच्या दरात 250 रुपयांनी वाढ, कालपासून 2,253 रुपयांची किंमत निश्चित करण्यात आली आहे, परंतु गोव्यात घरगुती सिलिंडरच्या दरात पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

टी-20, वनडे आणि कसोटी... हरमनप्रीत कौरने अचानक सोडले सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद, टीम इंडियाची धुरा आता कोणाकडे? 'या' खेळाडूचं नाव चर्चेत

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठ्या अपेक्षा! पगारवाढीपलीकडे OPS, कॅशलेस मेडिकलपासून रिस्क अलाऊन्सपर्यंत 'या' 9 प्रमुख मागण्या

गोव्यात सर्वात मोठा समाज, पण CM फक्त एकच; रवी नाईकांनंतर भंडारी समाजातील दिग्गज नेत्यांना संधी का मिळाली नाही? 2027 मध्ये दामू नाईकांचं काय?

Flydubai Flight Hijacking Plot: फ्लाईदुबई विमान हायजॅक मागे इराणचा हात? डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 9/11 सारखा हल्ला घडवण्याचा होता प्लॅन VIDEO

Shivaji Maharaj Statue: पुतळा हटवण्याऐवजी जागाच खरेदीचा प्रस्ताव; सरकारच्या धोरणावर गोवा खंडपीठ नाराज

SCROLL FOR NEXT