Petrol, Diesel Price In India Dainik Gomantak
अर्थविश्व

केंद्र सरकार कडून इंधनदरात कपातीच्या घोषणेनंतर पहा आजचा पेट्रोल, डिझेलचा दर एका क्लिकवर

Petrol, Diesel Price In India: सर्वसामान्यांना पेट्रोल, डिझेलच्या दरांसोबत गॅस सिलेंडरच्या दरांमधूनही दिलासा

दैनिक गोमन्तक

भारतामध्ये वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल डिझेलच्या दरांमध्ये कपात करण्यात आली आहे. देशात आता डिझेल प्रतिलीटर 9.49 आणि पेट्रोल 7.49 रूपये प्रतिलीटर स्वस्त करण्यात आला आहे. सरकारकडून एक्साईज ड्युटी, अबकरी कर कमी केल्याने ऑटो फ्युअलचे दर कमी केले आहेत. देशातील महागाईने मागील काही दिवसांत आतापर्यंतचे सारे विक्रम मोडीत काढले होते. (Petrol, Diesel Price In India News)

देशाची राजधानी दिल्ली मध्ये पेट्रोलची किंमत 105.41 रूपयांवरून 96.72 रूपये झाली आहे. तर डिझेलची किंमत 96.67 वरून 89.62 रूपये झाली आहे.

मुंबई मध्ये (Mumbai) पेट्रोलचे दर 120.51 वरून 111.35 रूपये झाले आहेत. तर डिझेल 104.77 रूपये वरून 97.28 रूपये प्रतिलीटर करण्यात आली आहे. दरम्यान राज्यातील व्हॅटचे दर यावर प्रत्येक जिल्ह्यातील अंतिम इंधन दर अवलंबून असतात.

पेट्रोल (Petrol) कोलकाता मध्ये 106.03 रूपये पेट्रोल झाले आहे. चेन्नई मध्ये 102.63 रूपये झाले आहे. कोलकाता मध्ये डिझेलची किंमत 92.76 आणि चेन्नई मध्ये 94.24 रूपये झाला आहे.

केंद्र सरकार पाठोपाठ राज्य सरकारनेही पेट्रोल आणि डिझेलवरचा कर कमी करावी अशी अपेक्षा केंद्र सरकारने व्यक्त केली आहे

सर्वसामान्यांना पेट्रोल, डिझेलच्या दरांसोबत गॅस सिलेंडरच्या दरांमधूनही दिलासा मिळाला आहे, असे केंद्र सरकारने सांगितले आहे. 12 सिलेंडरपर्यंत 200 रुपये प्रति सिलेंडर अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

त्यामुळे 9 कोटी उज्ज्वला योजना धारकांना याचा फायदा होणार आहे. त्यामुळे केंद्राला दरवर्षी जवळपास 6100 कोटी रुपयांचा फटका बसणार आहे. हा निर्णय तातडीने घेण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT