Petrol-Diesel becomes expensive again Dainik Gomantak
अर्थविश्व

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ

सरकारी तेल कंपन्यांनी डिझेलच्या (Diesel) दरात 25 पैशांनी वाढ केली आहे तर पेट्रोल 20 पैशांनी प्रति लिटर महागले आहे.

दैनिक गोमन्तक

शनिवारी पुन्हा पेट्रोल (Petrol)आणि डिझेलचे (Diesel) दर वाढले. सरकारी तेल कंपन्यांनी डिझेलच्या दरात 25 पैशांनी वाढ केली आहे तर पेट्रोल 20 पैशांनी प्रति लिटर महागले आहे. पुन्हा एकदा सलग दुसऱ्या दिवशी दिल्लीत पेट्रोल आता 102.14 रुपये प्रति लीटर झाले आहे. तर डिझेल 90.48 रुपयांवर पोहोचले आहे. त्याचबरोबर भोपाळमध्ये पेट्रोल 110.59 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.

काल शुक्रवारी पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 25 पैसे आणि डिझेलच्या दरात 30 पैशांनी वाढ करण्यात आली होती. यामुळे या उत्पादनांच्या किमती सर्वकालीन उच्चांपर्यंत पोहोचल्या. सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी जारी केलेल्या किंमतीच्या अधिसूचनेनुसार, दिल्लीत पेट्रोलची किंमत 101.89 रुपये प्रति लीटरच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचली होती, तर मुंबईत हा आकडा 107.95 रुपये प्रति लीटरच्या पातळीवर पोहोचला. स्थानिक कर आणि मालवाहतुकीवर अवलंबून देशाच्या वेगवेगळ्या भागात पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलतात.

यासह, मध्य प्रदेश, राजस्थान, ओडिशा, आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील अनेक शहरांमध्ये डिझेलची किंमत 100 रुपये प्रति लीटरची पातळी ओलांडली आहे, तर देशातील बहुतेक प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल 100 रुपये प्रति लीटर पार केले आहे. तेल कंपन्यांनी स्वीकारलेल्या किंमतीच्या सूत्रानुसार, पेट्रोल आणि डिझेलच्या दराचा आढावा घेतला जातो आणि दररोज ते बदलले जातात. पेट्रोल-डिझेलचे नवीन दर सकाळी 6 पासून लागू झाले आहेत.

दिल्ली - 102.14 90.48

मुंबई - 108.15 98.12

चेन्नई - 99.76 94.99

कोलकाता - 102.74 93.54

भोपाळ - 110.59 99.37

लखनौ - 99.20 90.85

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

Budh Gochar 2026: हस्त नक्षत्रात बुधाचे महागोचर! 5 राशींच्या जातकांची तिजोरी पैशांनी ओसंडून वाहणार; व्यवसायात येणार मोठी तेजी

Education System Crisis: सत्य निकेतनची इमारतच नाही, तर शिक्षण व्यवस्थाही ढासळतेय! विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेपासून शिक्षणाच्या बजेटपर्यंत गंभीर प्रश्न

Karapur Mega Project: 161 दिवसांनंतर कारापूरवासीयांचे आंदोलन अखेर मागे! 'वन गोवा' प्रकल्पाला काम बंद करण्याची पंचायतीची नोटीस; न्यायालयीन लढा मात्र सुरूच

Goa Forward AAP Alliance: 'गोवा फर्स्ट' आघाडीची तयारी अंतिम टप्प्यात! विजय सरदेसाईंना सर्वाधिकार; 'आप'सह समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचा निर्णय

SCROLL FOR NEXT