Pan Link to Aadhar Dainik Gomantak
अर्थविश्व

Pan Link to Aadhar: आता पॅनकार्ड आधारशी लिंक करावेच लागेल, प्राप्तिकर विभागाचा अल्टिमेटम

जमीन, घर किंवा कोणत्याही प्रकारच्या मालमत्तेची खरेदी-विक्री करणे कठीण होईल.

Pramod Yadav

प्राप्तिकर विभागाने पॅन कार्डधारकांना अंतिम मुदतीसोबत पॅन-आधार लिंक (Pan Link to Aadhar) करण्यासाठी अल्टिमेटम जारी केला आहे. निर्धारित वेळेत पॅन कार्ड आधारशी लिंक न केल्यास पॅनकार्डधारकांचे मोठे नुकसान होऊ शकते. आयकर विभागाने (Income Tax) पॅनकार्ड लिंक करणे म्हत्वाचे असल्याचे म्हटले आहे.

सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहारांसाठी आणि जमीन, घर किंवा कोणत्याही प्रकारची मालमत्ता खरेदी करण्यासाठी पॅन कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. पॅनकार्डच्या माध्यमातून आयकर विभाग संबंधित व्यक्तीचे आर्थिक खाते सांभाळत असते.

प्राप्तिकर कायदा 1961 नुसार, सर्व पॅन धारक जे सवलत श्रेणीत येत नाहीत त्यांनी 31 मार्च 2023 पूर्वी त्यांचे पॅन आधारशी लिंक करावे. तसे न केल्यास 1 एप्रिल 2023 पासून पॅन कार्ड निष्क्रिय होईल. त्यानंतर पॅनकार्ड पुन्हा कधीही वापरता येणार नाही. असे आयकर विभागाने म्हटले आहे.

पॅन लिंक नाही केल्यास काय होईल?

- पॅन कार्ड लिंक न केल्यास, ऑनलाइन आयटीआर भरण्यात अडचण येईल.

- पॅन-आधार लिंक नसल्यास, तुमचे जुने रिफंड देखील अडकतील.

- तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या आर्थिक व्यवहारासाठी पॅन वापरता येणार नाही.

- बँक खाते उघडण्यास परवानगी दिली जाणार नाही.

- बँक खात्यात पैसे जमा करण्यात अडचणी येतील.

- जमीन, घर किंवा कोणत्याही प्रकारच्या मालमत्तेची खरेदी-विक्री करणे कठीण होईल.

ऑनलाईन पद्धतीने असे करा पॅन-आधार लिंक

- सर्वप्रथम, आयकर विभागाच्या ई-फायलिंग वेबसाइटवर (www.incometaxindiaefiling.gov.in) जा.

- वेबसाइटवर स्वतःची नोंदणी करा. येथे पॅन क्रमांक तुमचा वापरकर्ता आयडी असेल.

- यूजर आयडी, पासवर्ड आणि जन्मतारीख टाकून लॉग इन करा.

- वेबसाइटवर तुम्हाला 'Link Aadhaar' हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला प्रोफाइल सेटिंगमध्ये जावे लागेल.

- प्रोफाइल सेटिंगमध्ये गेल्यावर आधार कार्ड लिंक करण्याचा पर्याय दिसेल, तो निवडा.

- यानंतर तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड भरा.

- आता खाली दाखवलेल्या 'Link Aadhaar' पर्यायावर क्लिक करा.

- ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक केले जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT