Elon Musk Dainik Gomantak
अर्थविश्व

Twitter च्या व्हिसल ब्लोअरकडून 55 कोटींची 'डील', Elon Musk ला मिळाले आणखी एक कारण

हे प्रकरण समोर आल्यानंतर मस्क यांना ट्विटरसोबतचा करार तोडण्याचे आणखी एक कारण मिळाले आहे.

दैनिक गोमन्तक

सोशल मीडिया दिग्गज ट्विटर आणि स्पेसएक्सचे सीईओ एलन मस्क यांच्यात सुमारे 42 अब्ज डॉलर्स (सुमारे 33 ट्रिलियन रुपये) च्या करारानंतर कायदेशीर खटला सुरू आहे. अब्जाधीश एलन मस्क यांनी ट्विटरवर सांगितले की, सोशल मीडिया वेबसाइटने व्हिसलब्लोअरला लाखो डॉलर्स देण्याचे ठरवले आहे.

हे प्रकरण समोर आल्यानंतर मस्क यांना ट्विटरसोबतचा करार तोडण्याचे आणखी एक कारण मिळाले आहे. ट्विटरने व्हिसलब्लोअर्सना मोठी रक्कम देण्याची चर्चा उघडकीस आल्यानंतर एलन यांनी हे वक्तव्य केले आहे. वॉल स्ट्रीट जनरलच्या अहवालातून समोर आले आहे की, ट्विटर वाद मिटवण्यासाठी कंपनीने व्हिसलब्लोअरला $7 दशलक्ष दिले. (सुमारे 55 कोटी रुपये) देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कंपनीवर गंभीर आरोप करण्यात आले

पीटर जाटको हे ट्विटरवर मुख्य सुरक्षा अधिकारी पदावर कार्यरत होते. त्यांना या वर्षाच्या सुरुवातीला ट्विटरने कंपनीतून काढून टाकले होते. कंपनी त्यांच्या सायबर सुरक्षेबाबत लोकांची दिशाभूल करत असल्याचा दावा जॅटकोने केला होता. इतकंच नाही तर कंपनी सायबर सुरक्षेच्या नियामकांनाही सावध करत आहे. कंपनी बनावट खात्यांवर कोणतीही कठोर कारवाई करत नसल्याचेही त्यांनी सांगितले. ते चुकीची माहिती पसरवत असल्याचा कंपनीचा आरोप होता.

ट्विटर फेक अकाऊंटने भरले आहे

टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ एलन मस्कच्या म्हणण्यानुसार, ट्विटर 'फेक, स्पॅम आणि बॉट अकाउंट्स'ने भरलेले आहे. या कारणामुळे मस्क यांनी ट्विटरशी करार तोडल्याचे सांगण्यात येत आहे. मस्क यांनी पुन्हा ट्विट करून, 'त्याच्या ट्विटरवरील 90 टक्के टिप्पण्या एकतर बनावट आहेत किंवा त्यांच्या ट्विटवरील बॉट अकाउंट आहेत.' असे वक्तव्य केले. दरम्यान, ट्विटरच्या सुरक्षेबाबत जातक पुढील आठवड्यात अमेरिकन सिनेट समितीसमोर साक्ष देणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cabinet Decision: खाण व्यवसायाला दिलासा! ट्रकसाठी रस्ता कर सवलत आता 2027 पर्यंत वाढवली; वाचा गोवा मंत्रिमंडळाचे तीन महत्त्वाचे निर्णय

Pooja Naik: 'पूजा नाईकच्या आरोपांना पुरावा मिळेना', DGP आलोक कुमार यांचा खुलासा; प्रकरणाचा तपास थंडावणार?

अग्रलेख: गोव्यात गुन्हा करा, 'बिनधास्त पसार' व्हा! सुरक्षा यंत्रणांना जाग येण्यापूर्वीच गुन्हेगार गायब

Goa Politics: 'शांत राहा! आघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात', मनोज परब यांचा दावा, कार्यकर्त्यांना संयम बाळगण्याचे आवाहन; Watch Video

DLF Housing Project: 'दाबोळी टेकडीवरील एकाही झाडाला हात लावू नका', कोर्टाची 'डीएलएफ'ला ताकीद

SCROLL FOR NEXT