PM Modi Dainik Gomantak
अर्थविश्व

Old Pension Scheme: सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी, बहाल होणार जुनी पेन्शन योजना; रद्द होणार नवी पेन्शन...

Old Pension Update: तुम्ही स्वतः सरकारी कर्मचारी असाल किंवा तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी कर्मचारी असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

Manish Jadhav

Old Pension Update: तुम्ही स्वतः सरकारी कर्मचारी असाल किंवा तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी कर्मचारी असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

22 डिसेंबर 2003 पर्यंत केंद्रीय कार्मिक मंत्रालयाने जारी केलेल्या भरतीच्या जाहिरातीतून नोकरी मिळालेले अधिकारी आणि कर्मचारी जुन्या पेन्शनसाठी पात्र मानले जातात.

यामध्ये आयएएस अधिकारी आणि कर्मचारी दोघेही पेन्शनचे हकदार आहेत. त्याच्या अर्जासाठी 31 ऑगस्ट 2023 चा पर्याय देण्यात आला आहे.

केंद्रीय कार्मिक मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव संजीव नारायण यांनी पाठवलेल्या पत्रानुसार, यूपीच्या कार्मिक विभागाने काम सुरु केले आहे.

कर्मचाऱ्यांच्या पगारातून 10 टक्के कपात

जानेवारी 2004 पासून देशातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी (Employees) जुनी पेन्शन रद्द करुन नवीन पेन्शन योजना (NPS) प्रणाली सुरु करण्यात आली होती. NPS अंतर्गत कर्मचार्‍यांच्या पगारातून 10 टक्के कपात केली जाते.

जुन्या पेन्शनमध्ये जीपीएफची सुविधा आहे, मात्र नवीन पेन्शनमध्ये ही सुविधा नाही. मागील काही महिन्यांपासून राज्य आणि केंद्रात जुनी पेन्शन लागू करण्यावरुन वादंग सुरु आहे.

काही राज्य सरकारांनी जुनी पेन्शन योजना बहार केली आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय कार्मिक मंत्रालयाच्या पत्रामुळे कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

यूपीचा कार्मिक विभाग संबंधित विभागांना पत्र पाठवत आहे

कार्मिक मंत्रालयाच्या पत्रानुसार, केंद्रीय सशस्त्र दलाचे कर्मचारी त्याच्या कक्षेत येणार नाहीत. यूपीचा कार्मिक विभाग या पत्राची प्रत सरकारच्या (Government) संबंधित विभागांना पाठवत आहे. याच्या कक्षेत येणाऱ्यांना 31 ऑगस्ट 2023 पर्यंत पर्याय निवडण्याचा पर्याय देण्यात आला आहे.

दुसरीकडे, कार्मिक मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रात सांगण्यात आले आहे की, 22 डिसेंबर 2003 पर्यंत सरकारी भरतीसाठी जारी करण्यात आलेल्या जाहिरातीअंतर्गत जानेवारी 2004 नंतर भरती झालेल्यांना जुनी पेन्शन देण्यासाठी सातत्याने अर्ज येत आहेत.

त्यामुळे 2003 पर्यंत जाहिरातींच्या आधारे नोकरी मिळालेल्या अधिकारी- कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनचा लाभ देण्याचा विचार करण्यात आला आहे. त्यासाठी सरकारने पर्यायही दिला आहे.

जर एखाद्याला जुन्या पेन्शन अंतर्गत नावनोंदणी करायची असेल तर त्याला त्याचा पर्याय निवडावा लागेल.

जर एखाद्या कर्मचाऱ्याने देय तारखेपर्यंत हा पर्याय निवडला नाही तर त्याला फक्त NPS चा लाभ मिळेल. जर कोणी जुन्या पेन्शनचा पर्याय निवडला तर 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत त्यांचे NPS खाते आदेश जारी करुन बंद केले जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT