Money Dainik Gomantak
अर्थविश्व

Old Pension Scheme: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी, जुन्या पेन्शन योजनेबाबत...

Old Pension Scheme: राजस्थान सरकारनंतर पंजाब, छत्तीसगड आणि झारखंडच्या सरकारांनी जुनी पेन्शन योजना (OPS) पुन्हा सुरु करण्याची घोषणा केली आहे.

दैनिक गोमन्तक

Old Pension Scheme Latest News: राजस्थान सरकारनंतर पंजाब, छत्तीसगड आणि झारखंडच्या सरकारांनी जुनी पेन्शन योजना (OPS) पुन्हा सुरु करण्याची घोषणा केली आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने राज्यात सरकार स्थापन झाल्यास जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन दिले आहे. दुसरीकडे, केंद्रीय कर्मचारीही जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून करत आहेत.

लोकसभा निवडणुकीपूर्वी विचार करता येईल

नवीन वर्षापूर्वी आलेल्या या वृत्ताने केंद्रीय कर्मचाऱ्यांनी (Employees) सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकार यावर विचार करु शकते, असा दावा सूत्रांनी केला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या दीर्घकाळापासूनच्या मागणीवर कायदा मंत्रालयाकडून सल्ला मागितला आहे.

भागवत कराड यांनीही भूमिका स्पष्ट केली

यापूर्वी, संसदेच्या मागील अधिवेशनात अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी जुनी पेन्शन योजना पूर्ववत सुरु करण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली होती. जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत केंद्र विचार करत नसल्याचे त्यांनी म्हटले होते.

नवीन पेन्शन योजना काय आहे?

नवीन पेन्शन योजनेला नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) असे नाव देण्यात आले आहे. यामध्ये कर्मचार्‍यांच्या मूळ पगार आणि महागाई भत्त्याच्या 10 टक्के रक्कम कापली जाते. NPS शेअर बाजाराच्या चढ-उतारावर आधारित आहे. वयाच्या 60 वर्षानंतर पेन्शन मिळवण्यासाठी एनपीएस फंडातील 40 टक्के रक्कम गुंतवावी लागते आणि 60 टक्के रकमेपैकी तुम्हाला पेन्शन मिळते. योजनेत निवृत्तीनंतर पेन्शनची (Pension) हमी नाही.

तसेच, अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या कार्यकाळात जुनी पेन्शन योजना (OPS) रद्द करण्यात आली होती. तसेच, जानेवारी 2004 पासून राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. वास्तविक, NPS ही अंशदान आधारित पेन्शन योजना असून त्यात महागाई भत्त्याची तरतूद नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

डिचोली तालुक्यात झेंडूचे मळे केशरी-पिवळ्या फुलांनी बहरले, कृषी खात्याच्या ‘आत्मा’ योजनेला मोठे यश; शेतकऱ्यांच्या मेहनतीला दसऱ्याचे फळ

Asian Para Games 2026: आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची धमाकेदार सुरुवात! 10 मीटर एअर रायफलमध्ये मोना अग्रवालला 'गोल्ड', तर अवनी लेखराला 'सिल्व्हर'

Goa Mining: 'गाव नष्ट होऊ देणार नाही!' होंडा ग्रामसभेत 'सोलये' खाणीचा प्रश्न ऐरणीवर; एनओसी रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार

Goa Sexual Assault Case: वेर्णा सामूहिक बलात्कार प्रकरणातील सहआरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल!

Property Dispute Attack: आंबावलीत मालमत्तेच्या वादातून तुफान हाणामारी! लाकडी दांड्याने हल्ला करुन वृद्धाला केले गंभीर जखमी; चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा

SCROLL FOR NEXT