Indian Money Dainik Gomantak
अर्थविश्व

Old Pension Scheme: सरकारी कर्मचाऱ्यांचे बल्ले-बल्ले, जुनी पेन्शन लागू करण्याबाबत आली मोठी अपडेट

Old Pension Scheme Update: दोन राज्यांचे निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर हिमाचल प्रदेशातील राज्य कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन योजनेबाबतच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

Old Pension Scheme Update: दोन राज्यांचे निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर हिमाचल प्रदेशातील राज्य कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन योजनेबाबतच्या अपेक्षा वाढल्या आहेत. हिमाचल निवडणुकीसाठी काँग्रेसने जारी केलेल्या जाहीरनाम्यात सत्तेत आल्यानंतर जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन दिले होते. आता देशातील इतर राज्यांमध्येही जुन्या पेन्शन योजनेबाबत उत्साह वाढला आहे. पुढील वर्षी मध्य प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. सध्या राज्यात भाजपचे सरकार आहे. अशा स्थितीत विरोधी पक्ष मोहात पाडणारी आश्वासने देत आहे.

कमलनाथ यांनी ट्विट केले आहे

पुढील वर्षी राज्यात काँग्रेसची (Congress) सत्ता आल्यास जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरु केली जाईल, असे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी सांगितले. 2004 मध्ये केंद्राने लागू केलेल्या 'नवीन पेन्शन योजने'च्या जागी जुनी पेन्शन योजना लागू केली जाईल, असे ते म्हणाले आहेत. मध्य प्रदेशात काँग्रेसचे सरकार आल्यावर शिवराज सरकारने रोखून ठेवलेली पेन्शन बहाल केली जाईल, असे कमलनाथ यांनी रविवारी एका ट्विटमध्ये म्हटले आहे.

'आश्‍वासन देऊन कमलनाथ परत फिरले'

भाजपचे सचिव रजनीश अग्रवाल यांनी कमलनाथ यांच्या आश्वासनाची दखल घेतली नाही. ते म्हणाले की, 'कमलनाथ यांचा इतिहास जनतेला आश्वासने देऊन ती पूर्ण न करण्याचा राहिला आहे. निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने मागे टाकण्यासाठी त्यांची ओळख आहे. मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) त्यांच्या गेल्या 15 महिन्यांच्या कारकिर्दीत हे दिसून आले. सत्तेत आल्यानंतर ते बदलतात.' मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक पावले उचलली आहेत. भाजप सरकारने सत्तेत आल्यानंतर सुरु केलेल्या सर्व योजना कमलनाथ यांनी बंद केल्याचेही ते म्हणाले.

तसेच, काँग्रेसने राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये आधीच जुनी पेन्शन योजना बहाल केली आहे. याशिवाय हिमाचलमध्ये जुनी पेन्शन लागू करण्याचे आश्वासन देऊन काँग्रेस पुन्हा सत्तेत आली आहे. दुसरीकडे, पंजाबच्या भगवंत मान सरकारनेही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू केली आहे. आता मध्य प्रदेशात जुनी पेन्शन लागू करण्याचे आश्वासन देऊन काँग्रेसने निवडणुकीची लढाई रंजक बनवली आहे. आता कोणते सरकार सत्तेवर येणार हे येत्या काळात ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

Calangute Illegal CRZ Construction: कळंगुटमधील अनधिकृत बांधकामांची 'घटका' जवळ! 'एनजीटी'कडून 'जीसीझेडएमए'चा पाडकाम आदेश कायम

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! वार्षिक वेतनवाढ 3 टक्क्यावरून 5 टक्के होणार? पगारात नेमकी किती वाढ होईल? जाणून घ्या

Goa Illegal liquor Seizure: कोंड्याच्या पोत्यांचा आडोसा अन् दारूची तस्करी! पेरणे अबकारी अधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे 3 लाख 78 हजारांचा माल जप्त

SCROLL FOR NEXT