Oil Companies Hiked LPG Gas Price In India In November. Dainik Gomantak
अर्थविश्व

Gas Price Hike: दिवाळीच्या तोंडावर महागाईचा मार, नोव्हेंबरच्या पहिल्याच दिवशी गॅस 103 रुपयांनी महागला

Gas Price: दिल्लीत घरगुती एलपीजीची किंमत 903 रुपये, कोलकात्यात 929 रुपये आणि मुंबईत 902.5 रुपये आहे. चेन्नईमध्ये 1 नोव्हेंबर 2023 रोजी घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 918.5 रुपये आहे.

Ashutosh Masgaunde

Oil Companies Hiked LPG Gas Price By 103 rs In India In November:

नवीन महिना सुरू होताच गॅसचे दर वाढले आहेत. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 103 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

चांगली बाब म्हणजे घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. मात्र, कमर्शिअल गॅसच्या किमती वाढल्यामुळे रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थ, मिठाई आणि इतर गोष्टींच्या किमती वाढू शकतात.

गेल्या ३२ दिवसांत कमर्शिअल गॅसच्या किमतीत सुमारे ३१० रुपयांनी वाढ झाली आहे.

19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत 100 रुपयांहून अधिक वाढ करण्यात आली आहे.

आता दिल्लीत 19 किलोचा सिलेंडर 1833 रुपयांना मिळणार आहे. त्याच वेळी, यासाठी तुम्हाला कोलकातामध्ये 1943 रुपये, मुंबईमध्ये 1785 रुपये आणि चेन्नईमध्ये 1999.50 रुपये द्यावे लागतील.

गेल्या महिन्यातही व्यावसायिक गॅसच्या दरात वाढ करण्यात आली होती. त्यामुळे पाच आठवड्यात गॅसच्या किमतीत 300 रुपयांनी वाढ झाली आहे.

गेल्या महिन्यात 1 ऑक्टोबर रोजी व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 209 रुपयांनी वाढ झाली होती.

गेल्या महिन्यात कोलकात्यात एलपीजी गॅसची किंमत 203.50 रुपयांनी वाढली होती. यावेळी 103.50 रुपयांनी वाढ झाली आहे. म्हणजेच 31 दिवसांत एलपीजीच्या किमतीत 307 रुपयांनी वाढ झाली आहे.

यावेळी घरगुती एलपीजीच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही ही दिलासादायक बाब आहे. 30 ऑगस्ट रोजी एलपीजीच्या किमतीत 200 रुपयांनी कपात करण्यात आली होती.

दिल्लीत घरगुती एलपीजीची किंमत 903 रुपये, कोलकात्यात 929 रुपये आणि मुंबईत 902.5 रुपये आहे. चेन्नईमध्ये 1 नोव्हेंबर 2023 रोजी घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 918.5 रुपये आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cyber Crime: 'पार्टटाईम नोकरी'च्या आमिषाने 3.69 लाखांचा गंडा; कोरगावातील युवतीची पोलिसांकडे फसवणुकीची तक्रार

Goa Market Complex: डिचोलीतील बाजार संकुलाची होणार दुरुस्ती; आमदारांकडून संकुलाची पाहणी

Goa Heavy Rain: सत्तरीत वादळी वाऱ्यामुळे 27 ठिकाणी झाडे कोसळली; पडझड सुरूच, अग्निशमन दलाची दिवसभर धावपळ

Goa Fraud Case: फरार बलरामच्या शोधासाठी विमानतळांवर 'अलर्ट'; ED अधिकाऱ्याचे सोंग घेऊन लूट, 'इंटर ऑपरेबल सिस्टिम'द्वारे शोध सुरू

Goa Drug Case: पणजी अमलीपदार्थ प्रकरण; संशयिताचा 'डिफॉल्ट' जामीन अर्ज फेटाळला, रासायनिक अहवालावरून कोर्टात खल

SCROLL FOR NEXT