NSE Scam Dainik Gomantak
अर्थविश्व

NSE Scam: कोण आहे मास्टरमाईंड 'योगी'? सीबीआयला मिळाले पुरावे

NSE घोटाळ्याबाबत सीबीआय तपासात महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत की, या संपूर्ण प्रकरणाचा मास्टरमाईंड 'अदृश्य योगी' कोण होता?

दैनिक गोमन्तक

एनएसई घोटाळ्याचा (NSE Scam) सूत्रधार 'योगी' की 'अदृश्य योगी' कोण होता? अशा चर्चा रंगत आहेत. आणि आता या रहस्यावरून पडदा उठतांना दिसत आहे. सीबीआय या प्रकरणाचा तपास करत असून त्यांना 'योगी'च्या ओळखीबाबत अनेक पुरावे मिळाले आहेत.

आनंदच आहे चित्राचा 'योगी'?

आनंदने rigyajursama@outlook.com नावाचा ई-मेल आयडी तयार केल्याचे या पुराव्यावरून दिसत आहे. या ई-मेल आयडीवर एनएसईच्या माजी एमडी आणि सीईओ चित्रा रामकृष्ण (Chitra Ramakrishna) 'अदृश्य योगी'शी बोलत होत्या. त्यांचा सल्ला घेत होत्या.

आनंदसोबत अनेक स्क्रीनशॉट्स सापडले

तपास एजन्सीच्या सूत्रांनी सांगितले की त्यांना आनंद सुब्रमण्यमच्या दुसऱ्या ई-मेल आयडीवरून चित्रा रामकृष्ण यांच्या ई-मेलचे काही स्क्रीनशॉट मिळाले आहेत. मात्र, 'योगी'च्या ओळखीबाबत सीबीआय अद्याप कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलेली नाही. बाजार नियामक SEBI ने NSE घोटाळ्याबाबत 7 फेब्रुवारीच्या आदेशात म्हटले होते की NSE च्या तत्कालीन CEO आणि MD चित्रा रामकृष्ण हे सर्व निर्णय काही अज्ञात योगींच्या सांगण्यावरून घेत होत्या. तपासादरम्यान, जेव्हा सेबीने चित्रा यांना योगीबद्दल विचारले तेव्हा एनएसईच्या माजी सीईओने सांगितले होते की कोणातरी एक आध्यात्मिक शक्ती आहेत, जी हिमालयात फिरते. चित्रा यांनी योगी अज्ञात असल्याचे सांगितले होते.

आनंद सुब्रमण्यम कोठडीत

NSE चे माजी ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर (GOO) आनंद सुब्रमण्यम यांना CBI ने चेन्नई येथून अटक केली आहे. एनएसई को-लोकेशन घोटाळ्याप्रकरणी (NSE Co-Location Scam) आनंदला अटक करण्यात आली आहे. दिल्ली न्यायालयाने शुक्रवारी सुब्रमण्यम यांना 6 मार्च 2022 पर्यंत सीबीआय कोठडी सुनावली. अशा स्थितीत या प्रकरणात आणखी नवे खुलासे होऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT