Nirmala Sitharaman  Dainik Gomantak
अर्थविश्व

तुम्ही हनुमानासारखे आहात का? अर्थमंत्र्यांचा उद्योग जगताला सवाल

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी उद्योग जगताची तुलना भगवान हनुमानांशी केली.

दैनिक गोमन्तक

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी उद्योग जगताची तुलना भगवान हनुमानांशी केली. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये गुंतवणूक करण्यास ते का टाळाटाळ करतात आणि कोणत्या गोष्टी त्यांना थांबवत आहेत, असा सवाल त्यांनी आज उपस्थित केला आहे.

दरम्यान, गुंतवणुकीबाबत गुंतवणूकदार काहीसा हात अखडता घेत असल्याचे दिसून येत आहे. तर दुसरकीडे मात्र, विदेशी गुंतवणूकदार भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यास इच्छा दाखवत आहेत.

"कोणतेही धोरण स्वतःच अंतिम असू शकत नाही. आपण पुढे जात असताना ते विकसित होत राहते. हे उदयोन्मुख क्षेत्राचा भाग असलेल्या उद्योगांना देखील लागू होते, ज्यासाठी आम्ही प्रोत्साहनाद्वारे धोरणात्मक समर्थन प्रदान केले आहे. मला इंडस्ट्रीकडून जाणून घ्यायचे आहे की ते गुंतवणूक करण्यास का टाळाटाळ करत आहेत... आम्ही उद्योग इथे आणण्यासाठी आणि गुंतवणूक करण्यासाठी सर्व प्रयत्न करू.. पण मला भारतीय उद्योगातील लोकांकडून ऐकायचे आहे की तुम्हाला कोणते प्रश्न उद्बवत आहे?", असे म्हणत सितारामन यांनी समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

इतर देशांचा भारतावर विश्वास

सीतारामन यांनी माइंडमाइन समिटमध्ये सांगितले की, "इतर देश आणि त्यांच्या उद्योगांना भारतावर विश्वास आहे. हे एफडीआय (फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट) आणि एफपीआय (फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट) गुंतवणुकीचा प्रवाह आणि शेअर बाजारावरील गुंतवणूकदारांचा विश्वास दर्शवते. तुम्ही हनुमानासारखे आहे का? तुमचा तुमच्या क्षमतेवर, तुमच्या ताकदीवर विश्वास नाही का? कोणीतरी तुमच्या शेजारी उभं राहून तुम्ही हनुमान आहात, असं सांगत आहे का? हा हनुमान आहे याला पुढे करा असं सांगणारा व्यक्ती कोण आहे? तुम्हाला असा सल्ला हे सरकार नक्कीच देवू शकत नाही," असे आज अर्थमंत्री म्हणाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT