Nirav Modi Latest News Dainik Gomantak
अर्थविश्व

Nirav Modi : नीरव मोदीला मोठा झटका, कोर्टाने दिला आत्तापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय

Nirav Modi Latest News : न्यायालयाने ईडीला नीरव मोदीच्या 500 कोटी रुपयांच्या 39 मालमत्ता जप्त करण्याची परवानगी दिली आहे.

दैनिक गोमन्तक

नीरव मोदीला न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. फरारी हिरे व्यापारी नीरव मोदीच्या 924 कोटी रुपयांच्या मालमत्तेबाबत मुंबईच्या विशेष पीएमएलए (प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्ट) न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे.

न्यायालयाने ईडीला नीरव मोदीच्या 500 कोटी रुपयांच्या 39 मालमत्ता जप्त करण्याची परवानगी दिली आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर आता ईडी ही मालमत्ता जप्त करणार आहे.

(Nirav Modi Latest News)

नीरव मोदीबाबत मोठा निर्णय

नीरव मोदी आणि त्याच्या कंपन्यांच्या 9 मालमत्तेचे अधिकार न्यायालयाने पंजाब नॅशनल बँकेला (PNB) दिले आहेत. प्रत्यक्षात 424 कोटी रुपयांच्या या मालमत्ता बँकेकडे गहाण ठेवण्यात आल्या होत्या. नीरव मोदीच्या पलायनानंतर बँकेने त्यांच्यावर दावा करणारी याचिका न्यायालयात दाखल केली होती.

या संपत्तीमध्ये न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्कमधील मालमत्ता, बँक खाती, दागिने आणि घड्याळांसह मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे. नीरव मोदीला विशेष पीएमएलए न्यायालयाने डिसेंबर 2019 मध्ये फरारी आर्थिक गुन्हेगार कायदा, 2018 अंतर्गत फरार घोषित केले होते.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की नुकतेच नीरव मोदीने म्हटले होते की, जर त्याला भारतीय पोलिसांच्या ताब्यात दिले तर तो जिवंत राहू शकणार नाही. म्हणजेच त्याला भारतात प्रत्यार्पण होण्याची भीती आहे.

लंडनच्या तुरुंगात कैद असलेल्या नीरवने मानसोपचार तज्ज्ञांना सांगितले की, जर त्याला भारतात प्रत्यार्पण केले गेले तर त्याला मारले जाईल. शेवटी मला तुरुंगातच मरावे लागेल, त्यामुळे त्याला भारतात यायचे नाही, असे त्याने सांगितले.

काय आहे प्रकरण ?

मेहुल चोकसेसह नीरव मोदीवर पंजाब नॅशनल बँकेची (पीएनबी) 14,500 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. तेव्हापासून तो भारतातून फरार आहे. फेब्रुवारीमध्ये ब्रिटनच्या वेस्टमिन्स्टर कोर्टाने मोदीच्या भारतात प्रत्यार्पणाला मंजुरी दिली होती.

मात्र त्यानंतर त्यांनी या निर्णयाविरोधात लंडन उच्च न्यायालयात अपील केले आहे. दुसरीकडे, भारताने त्याला परत आणण्याची तयारी केली असून, भारतात आणल्यानंतर त्याला मुंबईतील आर्थर रोड जेलच्या बॅरेक क्रमांक-12 मध्ये ठेवण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lashkar e Taiba Commander Encounter: पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड हाशिम मूसा एन्काउंटरमध्ये ढेर! 527 दिवसांचा थरार संपला; भारतीय सैन्याची मोठी कारवाई VIDEO

Viral Video: ट्रेन थांबली नसती तर... सेकंदाचा खेळ अन् घडला भयंकर प्रकार; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ तूफान व्हायरल

India vs Pakistan: एक-दोन नव्हे तर तब्बल 3 वेळा होऊ शकते भारत-पाकिस्तानची टक्कर! वर्ल्ड कप 2027 चं संपूर्ण गणित जाणून घ्या

Canacona Water Crisis: काणकोणमधील बंधारे अद्याप खुलेच; नद्या-नाले कोरडे, पाणीटंचाईचे संकट गडद

Municipal Election: पालिका प्रभागरचनेची घाई; सरकार-निवडणूक आयोग आमनेसामने, '24 तासांत काम कसे करणार?'

SCROLL FOR NEXT