ATM

 

Dainik Gomantak

अर्थविश्व

New Year: एटीएममधून पैसे काढण्यासाठी द्यावे लागणार ज्यादा पैसे !

बँक ग्राहकांना (Bank Customers) 1 जानेवारी 2022 पासून एटीएममधून पैसे काढण्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. मोफत मासिक मर्यादा संपल्यानंतर वाढलेले शुल्क लागू होईल.

दैनिक गोमन्तक

बँक ग्राहकांना (Bank Customers) 1 जानेवारी 2022 पासून एटीएममधून पैसे काढण्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. मोफत मासिक मर्यादा संपल्यानंतर वाढलेले शुल्क लागू होईल. वाढीव शुल्काबाबत ग्राहकांना संबंधित बँकांकडून संदेश मिळत आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने जूनमध्ये घोषणा केली होती की, देशातील बँकांना आता वापरकर्त्यांसाठी विनामूल्य मासिक मर्यादेपेक्षा जास्त रोख आणि नॉन-कॅश एटीएम व्यवहारांसाठी शुल्क वाढवण्याची परवानगी आहे.

दरांमधील हा बदल 1 जानेवारी 2022 पासून लागू होईल. आरबीआयने यापूर्वी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, बँकांना (Bank) प्रत्येक व्यवहारासाठी 21 रुपयांपर्यंत रक्कम वाढवण्याची परवानगी आहे. ही वाढ 1 जानेवारी 2022 पासून लागू होणार आहे.

अ‍ॅक्सिस बँकेने (Axis Bank) म्हटले की, आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, 01 -01-22 पासून अ‍ॅक्सिस बँक किंवा इतर बँकेच्या एटीएममध्ये मोफत मर्यादेपेक्षा जास्त आर्थिक व्यवहार शुल्क 21 रुपये + जीएसटी (GST) असेल. जानेवारीपासून, ग्राहकांनी मोफत व्यवहारांची मासिक मर्यादा ओलांडल्यास 20 रुपयांऐवजी 21 रुपये प्रति व्यवहार द्यावे लागतील. ग्राहक त्यांच्या बँक एटीएममधून दर महिन्याला पाच मोफत व्यवहारांसाठी ( Including financial and non-financial transactions) पात्र असतील. ते मेट्रो केंद्रांमधील इतर बँकेच्या एटीएममधून तीन आणि नॉन-मेट्रो केंद्रांवर पाच विनामूल्य व्यवहार करु शकतील.

याशिवाय, मध्यवर्ती बँकेने बँकांना आर्थिक व्यवहारांसाठी प्रत्येक व्यवहारासाठी इंटरचेंज शुल्क 15 रुपयांवरुन 17 रुपये आणि सर्व केंद्रांमधील गैर-आर्थिक व्यवहारांसाठी 5 रुपयांवरुन 6 रुपये करण्याची परवानगी दिली होती. हे 1 ऑगस्ट 2021 पासून लागू झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT