Women Dainik Gomantak
अर्थविश्व

Ladli Bahna Yojana: रक्षाबंधनापूर्वी महिलांच्या खात्यात येणार एवढे हजार? जाणून घ्या लाडली बहना योजनेची सत्यता

Ladli Bahna Yojana: केंद्र सरकार महिलांच्या विकास आणि उन्नतीसाठी अनेक मोठ्या योजना राबवते, ज्याचा थेट लाभ देशातील सर्व वयोगटातील महिलांना मिळतो.

Manish Jadhav

Ladli Bahna Yojana: केंद्र सरकार महिलांच्या विकास आणि उन्नतीसाठी अनेक मोठ्या योजना राबवते, ज्याचा थेट लाभ देशातील सर्व वयोगटातील महिलांना मिळतो. मात्र अनेकवेळा या सरकारी योजनांच्या नावांसारखीच नावे देऊन लोकांची फसवणूक केली जाते.

अशा लोकांना सोशल मीडियावर सरकारी योजनांचा लाभ दाखवून आपल्या जाळ्यात अडकवले जाते. असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दावा केला जात आहे की, रक्षाबंधनापूर्वी केंद्र सरकारने 'लाडली बहना योजने' अंतर्गत महिलांना दरमहा 3000 रुपये देण्याची घोषणा केली आहे.

दरम्यान, 'Tnf Today' नावाच्या फेसबुक पेजचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये केंद्रातील मोदी सरकारने रक्षाबंधनापूर्वी महिलांना मोठी भेट दिल्याचा दावा केला जात आहे.

लाडली बहना योजनेंतर्गत प्रत्येक महिलेला दरमहा 3000 रुपये मिळणार आहेत. मोदी सरकारने संसदेत ही योजना जाहीर केल्याचा दावा केला जात आहे.

दावा किती खरा आहे

दुसरीकडे, सरकारच्या (Government) वतीने या व्हायरल व्हिडिओची वस्तुस्थिती तपासताना पीआयबीने म्हटले आहे की, सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा मेसेज पूर्णपणे खोटा आहे आणि लाडली बहना योजना नावाची कोणतीही योजना केंद्र सरकार चालवत नाही.

लाडली बहना योजना

तथापि, मध्य प्रदेश सरकार याच नावाची एक योजना चालवते, ज्यामध्ये राज्यातील 21 ते 60 वयोगटातील महिलांना दरमहा 1,000 रुपये दिले जातील.

या योजनेंतर्गत राज्यातील 1 कोटी महिलांना जोडण्याचे उद्दिष्ट असून त्यासाठी सरकारने अर्थसंकल्पात दरवर्षीं 12 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

कोणत्याही शाळा किंवा महाविद्यालयात शिकणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी सर्वसाधारण, मागासवर्गीय, अनुसूचित जाती, जमातीतील महिला अर्ज करु शकतात.

तुम्ही या 5 ठिकाणांहून अर्ज करु शकता

पंचायत केंद्रातून

अकाउंटंट द्वारे

पंचायत सचिव मार्फत

प्रधानाद्वारे

विशेष शिबिर कार्यालयातून

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Birch By Romeo Lane Fire: लुथरा बंधूंसह अजय गुप्ताचा जामीन रद्द; 2 आठवड्यांत आत्मसमर्पणाचे गोवा हायकोर्टाचे आदेश

Tarun Tejpal Case: तेजपालला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; 3 आठवड्यांत तुरुंगात आत्मसमर्पण करण्याचे आदेश

Goa E20 Petrol: 'ई-20'चा सर्वाधिक फटका गोव्याला? केजरीवालांचा भाजप सरकारवर निशाणा; 40 टक्क्यांहून गोमंतकीयांकडे चारचाकी

Goa Congress: विधानसभा तिकीटासाठी 4 कोटींची बोली? खर्गेंच्या हॉटेल बिलावरूनही ग्रासियस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप

Pakistan AC Blast: पाकिस्तान हादरलं! रुग्णालयात एसी कॉम्प्रेसरचा भीषण स्फोट, 15 नवजात बालकांचा आगीत होरपळून मृत्यू; VIDEO

SCROLL FOR NEXT