Mukesh Ambani's Reliance buys 40 percent in Manish Malhotra's company Dainik Gomantak
अर्थविश्व

रिलायन्स आता फॅशन उद्योगातही , मनीष मल्होत्रांच्या कंपनीत गुंतवणूक

रिलायन्स (Reliance) फॅशन इंडस्ट्रीमध्ये आपला प्रवेश करण्याच्या दृष्टीने हे कंपनीचे एक मोठे पाऊल मानले जात आहे.

दैनिक गोमन्तक

मुकेश अंबानींची (Mukesh Ambani) कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) लिमिटेडची उपकंपनी रिलायन्स ब्रॅण्ड्स (Reliance Brands) लिमिटेडने प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा (Manish Malhotra) ​​यांची कंपनी एमएम स्टायल्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये (MM Style PVT. LTD.) 40 टक्के हिस्सा घेतला आहे. रिलायन्स फॅशन इंडस्ट्रीमध्ये आपला प्रवेश करण्याच्या दृष्टीने हे कंपनीचे एक मोठे पाऊल मानले जात आहे. रिलायन्स ब्रॅण्ड्सच्या एका निवेदनानुसार, एमएम स्टायल्स प्रायव्हेट लिमिटेडसाठी ही पहिली बाह्य गुंतवणूक आहे. तथापि, निवेदनात दोन्ही कंपन्यांमधील आर्थिक व्यवहार मात्र आणखीन समजू शकले नाहीत.(Mukesh Ambani's Reliance buys 40 percent in Manish Malhotra's company)

आतापर्यंत या कंपनीत फक्त मनीष मल्होत्रा ​​यांचीच गुंतवणूक होती. मनीष मल्होत्रा ​​यांची MM Styles ही फॅशन कंपनी 2005 मध्ये लाँच झाली होती . मनीष मल्होत्रा यांच्या या कंपनीचे मुंबई, नवी दिल्ली आणि हैदराबाद येथे चार फ्लॅगशिप स्टोअर्स आहेत.

एमएम स्टाईलमध्ये गुंतवणूक करण्यावर, रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडच्या संचालक ईशा अंबानी म्हणाल्या, “मनीष मल्होत्रा ​​यांच्याशी आमची धोरणात्मक भागीदारी त्यांच्या हस्तकलेबद्दलच्या प्रचंड आदर आणि भारतीय कला आणि संस्कृतीशी असलेल्या आमच्या वचनबद्धतेवर आधारित आहे. एक उद्योजक असल्याने, मनीष त्याच्या ब्रँडबद्दल खूप जागरूक आहेत."

त्याचबरोबर रिलायन्सने एका निवेदनात हे देखील स्पष्ट केले आहे की ही भागीदारी झाल्यांनतर देखील मनीष मल्होत्रा ​​कंपनीची मालकी कायम ठेवतील. मनीष मल्होत्रा ​​यांनी 2005 मध्ये MM स्टायल्स प्रायव्हेट लिमिटेड सुरु केली. आता हा ब्रँड खूप मोठा समूह बनला आहे, त्यात सुमारे 700 डिझायनर आणि व्यावसायिक काम करत आहेत, ज्याचे देखरेख मनीष मल्होत्रा ​​स्वतः करतात. दुसरीकडे, रिलायन्सला सात मिळाल्याने देशातील विविध शहरांमध्ये स्टोअर उघडण्याची शक्यता वाढणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT