Mukesh Ambani Dainik Gomantak
अर्थविश्व

Mukesh Ambani: भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल काय म्हणाले मुकेश अंबानी, वाचा सविस्तर

Mukesh Ambani Update: रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ पाहून खूप उत्साहित आहेत.

दैनिक गोमन्तक

Mukesh Ambani Latest News: रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ पाहून खूप उत्साहित आहेत. आज पंडित दीनदयाळ एनर्जी विद्यापीठाच्या 10 व्या दीक्षांत समारंभात ते म्हणाले की, आजचा काळ हा विद्यार्थ्यांचा आहे. 2047 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था $3 ट्रिलियन वरुन $40 ट्रिलियन पर्यंत वाढेल.'

3 घटकांकडे लक्ष द्या

दीक्षांत समारंभाला संबोधित करताना मुकेश अंबानी (Mukesh Ambani) म्हणाले की, 'येत्या दशकात भारताच्या विकासासाठी आपल्याला 3 घटकांवर लक्ष केंद्रित करावे लागेल. यामध्ये थिंक बिग, थिंक ग्रीन आणि थिंक डिजिटलवर लक्ष केंद्रित करावे लागेल. यासोबतच भारताला (India) अक्षय ऊर्जेचे पॉवर हाऊस बनवावे लागेल. यासोबतच आपल्याला क्लीन ऊर्जा, जैव ऊर्जा आणि डिजिटल ऊर्जा या माध्यमातून पुढे जायचे आहे.'

हे घटक भारताच्या विकासाचे कारक असतील

विद्यार्थ्यांना संबोधित करताना अंबानी पुढे म्हणाले की, 'क्लीन ऊर्जा आणि जैव उर्जेच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या जीवनात बरेच बदल होणार आहेत. यासोबतच ऊर्जा टिकून राहण्यासही मदत होईल. क्लीन ऊर्जा, जैव ऊर्जा आणि डिजिटल ऊर्जा हे भारताच्या विकासाचे कारक ठरतील.'

पुढच्या पिढीचीही काळजी घ्यावी लागेल

हरित ऊर्जेमुळे निसर्गाला चालना मिळेल आणि आपल्या भावी पिढ्यांसाठीही पृथ्वी क्लीन ठेवावी लागेल, जेणेकरुन त्यांनाही हरित ऊर्जा समजून घेता येईल आणि ती पुढे नेता येईल, असेही अंबानी म्हणाले.

मुकेश अंबानींनी विकासाचा मंत्र दिला

नंतर आपल्या विकासाचा मंत्र सांगताना अंबानी म्हणाले की, 'आपण सर्वांनी मोठा विचार केला पाहिजे. मोठी स्वप्ने पाहिली पाहिजेत. यासोबतच स्वप्नांचा पाठपुरावा धैर्याने, जिद्दीने आणि शिस्तीने केला पाहिजे, जेणेकरुन तुम्ही अशक्य गोष्टीही शक्य करुन दाखवू शकाल.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT