Monsoon Care Dainik Gomantak
अर्थविश्व

Monsoon Care: पावसाळ्यात इलेक्ट्रिक गाड्यांची घ्या खास काळजी; ‘या’ टिप्सची होईल मदत

पावसाळ्या इलेक्ट्रिक गाड्या चार्जिंग करतांना काळजी घेणे गरजेचे आहे.

Puja Bonkile

EVs Monsoon care: पावसाळा सुरु झाला आहे. आरोग्यासह अनेक वाहनांची काळजी घेणे देखील महत्वाचे असते. तसेच इलेक्ट्रिक वाहनांची देखभाल करणे देखील गरजेचे असते. सध्या अनेक लोक इलेक्ट्रिक वाहन खरेदी करतात. पण पावसाळ्यात वाहन सुरळित चालावे यासाठी कोणती कोळजी घेणे गरजेचे आहे हे समजून घेतले पाहिजे. तुमच्याकडेही इलेक्ट्रिक वाहन असेल तर पुढे सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

  • पावसापुर्वी इलेक्ट्रिक वाहनाची कोणती काळजी घ्यावी

पावसाचे पाणी वाहनात जावु नये म्हणून वाहनांची तपासणी करावी. वर्कशॉपमध्ये जाउन वाहन व्यवस्थित तपासुन घ्यावी.

  • चार्जिंग करतांना घ्यावी काळजी

पावसाळ्यात इलेक्ट्रिक वाहनांचे बॅटरीचे चार्जिंग करतांना खास काळजी घेणे गरजेचे आहे. जर पाऊस पडत असेल तर व्यवस्थित झाकलेल्या आणि कोरड्या भागात चार्जिंग करावे. चार्जिंगसाठी प्लग करण्यापूर्वी, शॉर्टसर्किट टाळण्यासाठी वाहन प्लग कोरडा आहे ना याची काळजी घ्यावी.

  • वाहनाचे संरक्षण कसे करावे

वाहन विमा हा केवळ पावसाळ्यातच नाही तर वर्षभर इलेक्ट्रिक वाहनांच्या संरक्षणासाठी आवश्यक आहे. इलेक्ट्रिक वाहनाला आग लागल्यास किंवा अपगात झाल्यास तुम्हाला आर्थिक मदत मिळते. यामुळे विमा काढणे गरजेचे असते.

  • पावसाळ्यात वाहन चालवताना घ्यावयाची काळजी

इलेक्ट्रिक वाहन पावसाळ्यात चालवतांना खास काळजी घ्यावी. खड्डे किंवा पाणी साचलेल्या रस्त्यावरून वाहन चालवणे टाळावे. दीर्घकाळापर्यंत कमी बॅटरी चार्जवर वारंवार ईव्ही चालवू नका.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT