Prime Minister Narendra Modi Dainik Gomantak
अर्थविश्व

Old Pension Scheme बाबत केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट, मोदी सरकारने केली 'ही' मोठी घोषणा

Old Pension Scheme Latest News: अनेक काँग्रेसशासित राज्यांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनचा लाभ दिला जात आहे.

Manish Jadhav

Old Pension Scheme Latest News: अनेक काँग्रेसशासित राज्यांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनचा लाभ दिला जात आहे.

हिमाचल सरकारकडून पेन्शन सुरु करण्यासाठी अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. हिमाचलमधील कर्मचाऱ्यांना 1 एप्रिल रोजी जुन्या पेन्शनचा लाभ मिळणार आहे.

जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकारमधील कर्मचारी दीर्घकाळापासून करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय कर्मचारीही जुनी पेन्शन लागू करण्याची मागणी करत आहेत.

NPS अंतर्गत जमा केलेला निधी परत केला जाणार नाही

या विषयावरील चर्चेदरम्यान अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी राज्यसभेत उत्तर दिले. केंद्र सरकार कोणत्याही प्रकारे जुनी पेन्शन योजना पूर्ववत करण्याच्या प्रस्तावावर विचार करत नसल्याचे त्यांनी आपल्या उत्तरात स्पष्ट केले.

ते म्हणाले की, जी राज्य सरकारे जुनी पेन्शन परत करु इच्छितात त्यांना एनपीएस अंतर्गत जमा झालेल्या निधीचा परतावा मिळणार नाही. पीएफआरडीए कायद्यात याबाबत कोणतीही तरतूद नाही.

परताव्याची तरतूद नाही

मोदी सरकारच्या वतीने सांगण्यात आले की, बिगर-भाजप शासित राज्ये, ज्यांनी जुनी पेन्शन योजना (OPS) पुनर्संचयित केली आहे, ते NPS मध्ये जमा झालेला निधी परत करण्याची मागणी करत आहेत.

ते पुढे म्हणाले की, एनपीएसमधील निधी काढण्यासाठी पीएफआरडीए कायद्यात कोणतीही तरतूद नाही. राजस्थान, झारखंड, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश आणि पंजाब (Punjab) सरकारांनी जुनी पेन्शन बहाल करण्याच्या निर्णयाची माहिती केंद्राला देण्यात आली. या राज्य सरकारांनी एनपीएस अंतर्गत जमा केलेली रक्कम परत करण्याची विनंती केली आहे.

कराड म्हणाले की, पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटी अॅक्ट, 2013 अंतर्गत ग्राहकांचा जमा झालेला निधी परत करता येईल अशी कोणतीही तरतूद नाही.

कराड यांनी माहिती दिली की, 1 जानेवारी 2004 नंतर भरती झालेल्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या (Employees) संदर्भात ओपीएस पुनर्स्थापित करण्याच्या कोणत्याही प्रस्तावावर केंद्र सरकार विचार करत नाही.

1 जानेवारी 2004 पासून सरकारी सेवेत (सशस्त्र दल वगळता) सर्व नवीन भरती करणे अनिवार्य करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT