MobiKwik will launch IPO soon SEBI allows  Dainik Gomantak
अर्थविश्व

MobiKwik चा IPO येतोय ; 1,900 कोटी रुपये करणार उभा

यासाठी MobiKwikला SEBI कडून मान्यताहदेखील मिळाली आहे.

दैनिक गोमन्तक

ऑनलाईन पेमेंट (Online Payment) सुविधा कंपनी MobiKwik लवकरच बाजारात आपल्या कंपनीचा IPO आणणार आहे. यासाठी मोबिक्विकला SEBI कडून मान्यताहदेखील मिळाली आहे. कंपनीने आपल्या IPO द्वारे बाजारातून 1,900 कोटी रुपये उभारण्याची योजना आखली आहे.गुरुग्राम स्थित कंपनीने जुलै महिन्यात सेबीकडे आरंभिक सार्वजनिक अर्पणासाठी ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) दाखल केला होता.(MobiKwik will launch IPO soon SEBI allows)

कंपनीच्या या आयपीओमध्ये 1500 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स आणि ऑफर फॉर सेल अंतर्गत 400 कोटी किमतीच्या शेअर्सची विक्री समाविष्ट आहे. या विक्री अंतर्गत, कंपनीचे दोन संस्थापक आणि विद्यमान गुंतवणूकदार त्यांचे भागभांडवल विकतील. ज्यामध्ये सिक्वॉया कॅपिटल, बजाज फायनान्स आणि अमेरिकन एक्सप्रेसचा समावेश आहे.

कंपनीतील अनेक जण, कंपनी प्रमोटर, उपासना टाकू सोबतच अमेरिकन एक्सप्रेस ट्रॅव्हल रिलेटेड सर्व्हिसेस कंपनी इंक, बजाज फायनान्स, सिस्को सिस्टीम्स पीटीई लि., सेक्वॉया कॅपिटल इंडिया इन्व्हेस्टमेंट होल्डिंग्ज , सेक्विया कॅपिटल इंडिया इन्व्हेस्टमेंट , ट्री लाइन एशिया मास्टर फंड सिंगापूर पीटीई लि. आणि बिपीन प्रीत सिंग आयपीओद्वारे आपले शेअर्स विकतील.

MobiKwik Systems ही एक अग्रणी मोबाईल वॉलेट आहेआणि ती आता ऑनलाइन व्यवहार वापरकर्त्यांच्या असमाधान क्रेडिट गरजा पूर्ण करण्यावरभर देत आहे. ही कंपनी 2009 मध्ये उपासना टाकू आणि बिपिन प्रीत सिंग यांनी सुरू केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dance Viral Video: माझ्या डोईवरी भरली घागर रे... कोकणातल्या पोरांचा डान्स पाहून तुम्हीही म्हणाल, 'एक नंबर...'

Vice President Candidate: ठरलं! एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा

Goa Film Festival 2025: ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित, ‘जुझे’ ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता चित्रपट

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

Viral Video: 'सापांचा राजा'! जगातील सर्वात लांब विषारी सापाचा व्हिडिओ व्हायरल, एका हल्ल्यात घेऊ शकतो हत्तीचाही जीव

SCROLL FOR NEXT