M&M Dainik Gomantak
अर्थविश्व

Mahindra 'MSSSPL' कंपनीमधील 212 कोटी रुपयांचा विकणार हिस्सा

महिंद्रा अँड महिंद्राने एका नियामक नोटिसमध्ये म्हटले की, या शेअर विक्रीनंतर MSSSPL मधील त्यांची हिस्सेदारी 'शून्य' होणार आहे.

दैनिक गोमन्तक

देशातील सुप्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा (M&M) ने महिंद्रा सान्यो स्पेशल स्टील प्रायव्हेट लिमिटेड (Mahindra Sanyo Special Steel Pvt. Ltd.) मधील 34.75 लाख शेअर्स जपानस्थित सान्यो स्पेशल स्टील कंपनी लिमिटेडला 212 कोटी रुपयांना विकण्याचे मान्य केले आहे. (Mahindra MSSSPL to sell Rs 212 crore stake)

महिंद्रा अँड महिंद्राने एका नियामक नोटिसमध्ये म्हटले की, या शेअर विक्रीनंतर MSSSPL मधील त्यांची हिस्सेदारी 'शून्य' होणार आहे. महिंद्रा सान्यो स्पेशल स्टील प्रायव्हेट लिमिटेड (MSSSPL) मधील पेड-अप भांडवलाच्या 22.81 टक्क्यांनी विकले जाणारे शेअर्स आहेत.

कंपनीचे काय म्हणणे आहे?

मुंबईस्थित ऑटोमेकरला त्याच्या स्टेकच्या विक्रीतून 211.99 कोटी रुपये मिळणार आहेत. M&M ने सांगितले की 31 मार्च 2021 रोजी संपलेल्या वर्षात MSSSPL ची उलाढाल 834.43 कोटी रुपये एवढी होती, जी कंपनीच्या एकत्रित व्यवसायाच्या 1.12 टक्के एवढी आहे.

महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड ही एक भारतीय बहुराष्ट्रीय ऑटोमोटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन कंपनी आहे ज्याचे ऑफिस मुंबईमध्ये आहे. त्याची स्थापना 1945 मध्ये महिंद्रा अँड मुहम्मद म्हणून करण्यात आली आणि त्यानंतर त्याचे नाव महिंद्रा अँड महिंद्रा असे ठेवण्यात आले. महिंद्रा समूहाचा एक भाग, M&M उत्पादनाच्या बाबतीत भारतातील सर्वात मोठ्या वाहन उत्पादकांपैकी एक आहे, महिंद्र अँड महिंद्राचा शेअर 865 रुपये एवढा आहे. गेल्या पाच ट्रेडिंग सत्रांमध्ये तो 4.96 टक्क्यांनी वाढला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nepal Flood: पीडितांचे हात सरसावले पूरग्रस्तांच्या मदतीला; आसाम, नेपाळसाठी 3 टन मदतसामग्री गोव्‍यातून रवाना

IND vs PAK: रविवारी ठरणार सुपर संडे! आशिया कपच्या फायनलमध्ये भारत-पाकिस्तान भिडणार? चाहत्यांसाठी पर्वणी

Bicholim Traffic Restrictions: डिचोलीत चतुर्थी बाजाराची लगबग; शनिवारपासून वाहनांना 'नो एंट्री'! सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत वाहतुकीवर निर्बंध

Sadetod Nayak: काँग्रेस युतीसाठी प्रयत्नशील, आता गोवा फॉरवर्डनेही स्पष्ट भूमिका घेण्याची गरज

Goa Politics: रॉय नाईक यांचा नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा! फोंड्यापासून मडकईपर्यंत राजकीय चर्चांना उधाण; पुढचा डाव कोणता?

SCROLL FOR NEXT