LPG Subsidy For Ujjawala Yojana Beneficiaries 
अर्थविश्व

Ujjawala Yojana: उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी, आता फक्त 600 रुपयांत मिळणार सिलिंडर

अनुदानची रक्कम 200 रुपये प्रति सिलेंडरवरून 300 रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणा

Pramod Yadav

LPG Subsidy For Ujjawala Yojana Beneficiaries: उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना दिवाळीपूर्वी मोदी सरकारकडून मोठी भेट देण्यात आली आहे. योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुदानची रक्कम 200 रुपये प्रति सिलेंडरवरून 300 रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणा सरकारने बुधवारी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी याबाबत माहिती दिली.

उज्ज्वला लाभार्थी सध्या 14.2 किलोच्या एलपीजी सिलिंडरसाठी 703 रुपये देतात, तर त्याची बाजारातील किंमत 903 रुपये आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर आता लाभार्थ्यांना 603 रुपयांना सिलिंडर मिळणार आहे.

केंद्र सरकार आतापर्यंत उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलिंडरवर 200 रुपये सबसिडी देत ​​होते. आता त्यात आणखी 100 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यासह एकूण नवीन अनुदान 300 रुपये झाले आहे.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुदानाची रक्कम वाढवण्याबाबत माहिती दिली. ग्रामीण आणि वंचित कुटुंबांना एलपीजी गॅस सिलिंडर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू करण्यात आली होती.

इतर कोणते निर्णय घेतले?

मंत्रिमंडळाच्या बैठकीत तेलंगणात वनदेवतेच्या नावाने केंद्रीय आदिवासी विद्यापीठ सुरू करण्यासही मंजुरी दिली. 889 कोटी रुपये खर्चून केंद्रीय आदिवासी विद्यापीठ सुरू करण्यात येणार आहे.

केंद्रीय हळद मंडळाच्या स्थापनेलाही मंत्रिमंडळाने मान्यता दिली. पीएम मोदींनी तेलंगणातही याची घोषणा केली होती.

भारत सर्वात मोठा हळद उत्पादक आणि ग्राहक देश आहे. 8400 कोटी रुपयांच्या हळद निर्यातीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी केंद्रीय हळद मंडळाच्या स्थापनेला मान्यता देण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT