LPG Price  Dainik Gomantak
अर्थविश्व

LPG Price: सर्वसामान्यांना दिलासा! व्यावसायिक सिलिंडरमध्ये मोठी घट, पण घरगुती..

एलपीजी सिलेंडरच्या दरात आज पुन्हा मोठी घट झालेली पाहायला मिळत आहे. व्यावसायीक सिलेंडरच्या किंमतीत घट झाली असून घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.

दैनिक गोमन्तक

LPG New Rate: व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत पुन्हा एकदा मोठी कपात झाली आहे. तेल कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात घट करण्यात आली आहे. १ जूनपासून म्हणजेच आजपासून एलपीजी सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे.तब्बल १७२ रुपयांची घट केली आहे. यामुळे व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. पण, घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

  • घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल नाही

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत घट झाली आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

मार्च 2023 रोजी घरगुती सिलिंडरच्या किंमतीत बदल करण्यात आला होता. त्यामुळे आज घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर मुंबईमध्ये 1102.5 रुपये, दिल्लीमध्ये 1103 रुपये, लेहमध्ये 1340, भोपाळमध्ये 1108.5, जयपूरमध्ये 1106.5, बंगळुरूमध्ये 1105.5 रुपये आणि श्रीनगरमध्ये 1219 रुपयांना खरेदी करावा लागत आहे.

  • विमान प्रवास स्वत: होण्याची शक्यता

व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये घट करताना तेल कंपन्यांनी जेट इंधनाच्या किंमतीतही 1 जूनपासून नवे दर लागू केले. त्यामुळे जेट इंधनाच्या किंमतीत सुमारे 6,600 रुपयांची घट झाली आहे. यामुळेविमान प्रवास स्वत होउ शकतो.

  • तेलाची किंमत कशी ठरवली जाते?

सरकारी तेल कंपन्या देशातील एलपीजीचे दर प्रत्येक महिन्यात ठरवले जातात. कच्च्या इंधनाच्या जागतिक दरांच्या आधारावर तेलाच्या किमती ठरवल्या जातात. त्यामुळे दर महिन्याला तेलाच्या किमती बदलल्या जातात.

कच्च्या तेलाच्या किमतीचा थेट परिणाम एलपीजीच्या किमतीवर होतो. याशिवाय FOB, वाहतूक, विमा, कस्टम ड्युटी आणि पोर्ट ड्युटी इत्यादी कारणांमुळे एलपीजीच्या किमतीही बदलतात. त्यामुळे https://Iocl.Com/Products/Indanegas.Aspx यावर वर क्लिक करून नवीन व्यावसायिक एलपीजी दर पाहू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Accident: बेदरकार मिनी बसचालकाने दुचाकीला उडवले! दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू; आके-पॉवरहाऊस मार्गावर भीषण अपघात

Goa Crime: पर्वरी गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई! दुसरा मुख्य शूटर 'अन्ना' चेन्नईतून गजाआड; आतापर्यंत सहा आरोपी अटकेत

Rahu Gochar 2026: राहु बनवणार अफाट श्रीमंत! 'या' 5 राशींवर होणार पैशांचा पाऊस; राजयोगासारखे मिळणार फळ

Goa Politics: भेटींचा उत्सव, मतांचा ध्यास! गणेश चतुर्थीत राजकीय नेत्यांच्या भेटीगाठींना उधाण; दर्शनासोबत निवडणुकीच्या समीकरणांचीही चर्चा

America Iran War: 6 महिन्यांत 3.21 लाख कोटींची राखरांगोळी, फायटर जेट्स उद्ध्वस्त, अमेरिकन दूतावासांवर हल्ले; पेंटागनच्या ऑडिट रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT