LPG Price News| LPG Price news updates Dainik Gomantak
अर्थविश्व

LPG Price Reduced: LPG च्या दरात कपात,जाणून घ्या कितीने झाले स्वस्त

देशातील LPG वापरकर्त्यांना दिलासा! 19 किलोचा व्यावसायिक LPG सिलेंडर स्वस्त झाला आहे.

दैनिक गोमन्तक

LPG सिलिंडर वापरणार्‍या ग्राहकांना आज व्यावसायिक LPG सिलेंडरच्या (19 kg) किमती कमी करण्यात आल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने (IOC) व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात केली आहे. यानंतर दिल्लीत एलपीजी सिलिंडरची किंमत 36 रुपयांनी स्वस्त झाली आहे

जाणून घ्या आज व्यावसायिक LPG सिलिंडरच्या किमती किती स्वस्त झाल्या

दिल्लीत एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 36 रुपयांची कपात केल्यानंतर ती 1976.50 रुपये प्रति सिलेंडर झाली आहे. यापूर्वी त्याची किंमत प्रति सिलेंडर 2012.50 रुपये होती.

कोलकातामध्ये एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 36.50 रुपयांची कपात केल्यानंतर ती 2095.50 रुपये प्रति सिलिंडर झाली आहे. यापूर्वी त्याची किंमत प्रति सिलेंडर2132 रुपये होती.

मुंबईत (Mumbai) एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 36 रुपयांनी कपात केल्यानंतर आता 1936.50 रुपये प्रति सिलेंडर झाला आहे. जो पूर्वी 1972.50 रुपये प्रति सिलेंडर होता.

चेन्नईमध्ये एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 36.50 रुपयांची कपात केल्यानंतर 2141 रुपये प्रति सिलिंडर झाला आहे. यापूर्वी त्याची किंमत 2177.50 रुपये प्रति सिलेंडर होती.

कोणाला मिळणार फायदा
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन म्हणजेच IOC च्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, 19 किलोच्या कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमतीत 36 रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे. रेस्टॉरंट, हॉटेल्स (Hotel) , ढाबा आणि इतर व्यावसायिक वापरकर्त्यांना 19 किलोचा सिलेंडर 36 रुपयांनी स्वस्त होण्याचा मुख्य फायदा मिळणार आहे.

घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमती विनाअनुदानित घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती
आज ना महाग झाल्या आहेत ना स्वस्त. 14.2 किलोचे घरगुती एलपीजी सिलिंडर 6 जुलैच्या दराने उपलब्ध आहे. त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतींवर नजर टाकली तर ते 1000 रुपयांच्या पुढे राहिले आहेत. दिल्लीत 1053 रुपये, मुंबईत 1053 रुपये, कोलकात्यात 1079 रुपये आणि चेन्नईमध्ये 1068.50 रुपये मिळत असून त्याच्या किमतींवर कोणताही दिलासा नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT