LPG Gas Cylinder  Dainik Gomantak
अर्थविश्व

LPG Cylinder Price: मोठी बातमी, दिवाळीपूर्वी स्वस्त होणार सिलिंडर; सरकारने केला हा प्लॅन!

LPG Price Today: गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत आहे.

दैनिक गोमन्तक

LPG Price Latest News: गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या 2 वर्षांची आकडेवारी पाहता एलपीजीच्या किमतीत बंपर वाढ झाली असली तरी गॅस सिलिंडरच्या किमती कमी करण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

सरकारी तेल कंपन्या दर जारी करतात

गॅसचे वितरण इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड करते. मात्र गेल्या 2 वर्षांपासून सातत्याने दर वाढल्यानंतरही या कंपन्या तोटा सहन करुन गॅसचे वितरण करत आहेत.

महागड्या एलपीजीपासून दिलासा

पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत सरकारी तेल कंपन्यांना 22 हजार कोटी रुपयांचे एकरकमी अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या कंपन्यांचा तोटाही भरुन निघणार असून, सर्वसामान्यांनाही महागड्या एलपीजीपासून दिलासा मिळणार आहे.

2 वर्षात 459 ची वाढ

दुसरीकडे, मोदी सरकारमधील (Modi Government) मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, 'कंपन्यांवरील आर्थिक दबाव कमी करण्यासाठी आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.' ऑक्टोबर 2020 पासून आत्तापर्यंत म्हणजे गेल्या 2 वर्षात गॅसच्या किमतीत 459 रुपयांनी वाढ झाली आहे.

आजचे दर तपासा

तसेच, 1 ऑक्टोबर 2020 रोजी राजधानी दिल्लीत (Delhi) 14.2 किलो गॅस सिलिंडरची किंमत 594 रुपये होती. याशिवाय कोलकात्यात 620.50 रुपये, चेन्नईमध्ये 610 रुपये आणि मुंबईत 594 रुपये होते. त्याच वेळी, जर आजच्या किमतींबद्दल बोलायचे झाल्यास, दिल्लीमध्ये 1053 रुपये, कोलकातामध्ये 1079 रुपये, मुंबईमध्ये (Mumbai) 1052.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 168.50 रुपये आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT