Gas Cylinders  Dainik Gomantak
अर्थविश्व

सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी, Gas Cylinders 300 रुपयांनी स्वस्त; आजच करा बुकिंग

तुम्ही तात्काळ गॅस सिलेंडर बुक करणार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

दैनिक गोमन्तक

LPG Gas Cylinder Price: तुम्ही तात्काळ गॅस सिलेंडर बुक करणार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. एकीकडे देशभरात गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ होताना दिसत आहे. त्याच वेळी, तुम्हाला सुमारे 300 रुपयांनी स्वस्त गॅस सिलिंडर मिळणार आहे. तुम्हाला स्वस्तात गॅस बुक करण्याची संधी आहे. फक्त 750 रुपयांमध्ये सिलिंडर कसा मिळेल ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत...

इंडेनने सुविधा सुरु केली

इंडेन या सरकारी तेल कंपनीने सर्वसामान्यांसाठी एक खास सुविधा सुरु केली आहे. इंडेनच्या या सुविधेअंतर्गत तुम्हाला फक्त 750 रुपयांमध्ये गॅस सिलिंडर (Gas Cylinder) मिळेल.

कंपोझिट सिलेंडरची सुविधा सुरु झाली

इंडेनने ग्राहकांसाठी कंपोझिट सिलिंडरची सुविधा सुरु केली आहे. हा सिलिंडर घेण्यासाठी तुम्हाला फक्त 750 रुपये खर्च करावे लागतील. या सिलिंडरचे वैशिष्ट्य म्हणजे, ते तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे ट्रान्सफर करु शकता.

गॅस सिलिंडरचे दर गगनाला भिडले

सध्या देशभरात गॅस सिलिंडरच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. दिल्लीत (Delhi) 14.2 किलोच्या सिलेंडरची किंमत 1053 रुपये आहे. अशा परिस्थितीत सरकारी कंपनी इंडेनकडून तुम्हाला 750 रुपयांना सिलिंडर दिला जात आहे.

लवकरच सर्व शहरांमध्ये सिलिंडर उपलब्ध होणार

कंपोझिट सिलेंडर वजनाने हलके असतात. तुम्हाला त्यात 10 किलो गॅस मिळतो. या कारणास्तव, या सिलिंडरची किंमत कमी आहे. सध्या हे सिलिंडर 28 हून अधिक शहरांमध्ये उपलब्ध आहेत, परंतु कंपनी लवकरच सर्व शहरांमध्ये हे सिलिंडर उपलब्ध करुन देण्याचे काम करणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Nightclub Fire: 'बर्च' दुर्घटना, पाचही संशयित 14 दिवस न्यायालयीन कोठडीत!

IND VS SA: धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका सामना रद्द, चाहत्याचं भंगलं स्वप्न; BCCIवर संताप

Hitler DNA Analysis: गंभीर लैंगिक आणि मानसिक आजाराचा सामना करत होता 'हिटलर'; DNA चाचणीतून झाला खळबळजनक खुलासा

चित्रपट हिट, रेहमानचा डान्स सुपरहिट, पण अक्षय खन्ना म्हणतो 'फरक पडत नाही'; धुरंधरच्या यशावर दिलं 3 शब्दांत उत्तर!

IND vs SA 5th T20: मालिकेचा फैसला अहमदाबादमध्ये! पाचव्या टी-20 सामन्यावर हवामानाचं सावट की पावसाची खेळी? जाणून घ्या खेळपट्टी आणि वेदर रिपोर्ट

SCROLL FOR NEXT