LPG Cylinder Rate Updates Dainik Gomantak
अर्थविश्व

LPG Consumers साठी मोठी बातमी! वर्षभरात मिळणार फक्त 15 सिलेंडर, तर महिन्याचा कोटाही निश्चित!

LPG News : आता महिन्याभरात केवळ दोनच सिलेंडर मिळणार आहेत.

दैनिक गोमन्तक

घरगुती LPG ग्राहकांना आता सिलिंडरसाठी रेशनिंग प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे. आता नवीन नियमांनुसार एका कनेक्शनवर वर्षभरात फक्त 15 सिलिंडर मिळणार आहेत. कोणत्याही परिस्थितीत यापेक्षा जास्त सिलिंडर दिले जाणार नाहीत. त्याचबरोबर एक महिन्याचा कोटाही निश्चित करण्यात आला आहे. कोणताही ग्राहक एका महिन्यात दोनपेक्षा जास्त सिलेंडर घेऊ शकत नाही. आत्तापर्यंत घरगुती विना-अनुदान कनेक्शनधारकांना हवं तेव्हा आणि वर्षभरात लागतील तेवढे सिलेंडर मिळत होते.

या तक्रारी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला

वितरकांनी दिलेल्या माहितीनुसार रेशनिंगसाठीच्या सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्यात आला आहे. त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यात आली आहे. हे पाऊल उचलण्यात आले आहे कारण अनेक दिवसांपासून विभागाला अशा तक्रारी येत होत्या की, घरगुती विनाअनुदानित रिफिल व्यावसायिकांपेक्षा स्वस्त असल्याने तेथे वापरल्या जात आहेत. 

सबसिडीमध्ये फक्त 12 सिलिंडर मिळणार

मिळालेल्या माहितीनुसार, हे बदल तिन्ही तेल कंपन्यांच्या ग्राहकांवर लागू करण्यात आले आहेत. अनुदानित घरगुती गॅससाठी नोंदणी केलेल्यांना या दराने वर्षभरात फक्त 12 सिलिंडर मिळतील. यापेक्षा जास्त गरज असल्यास अनुदान नसलेले सिलिंडरच घ्यावे लागतील. 

ही संख्या 15 पेक्षा जास्त असू शकत नाही,
असे सांगितले जात आहे की रेशनिंग अंतर्गत, एका कनेक्शनवर महिन्यात फक्त दोन सिलिंडर उपलब्ध होतील. कोणत्याही परिस्थितीत ही संख्या एका वर्षात 15 पेक्षा जास्त असू शकत नाही. जर एखाद्या ग्राहकाला गॅसची जास्त किंमत मोजावी लागत असेल, तर त्याचा पुरावा देताना त्याला तेल कंपनीच्या अधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागेल. तरच तुम्हाला अतिरिक्त रिफिल मिळू शकेल. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT