या महिन्यात सलग दुसऱ्यांदा स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या (Gas cylinder) किमती वाढण्याची शक्यता आहे.  Dainik Gomantak
अर्थविश्व

स्वयंपाकाचा गॅस सामान्यांची दिवाळी करणार कडू?, किंमतीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता

सध्या दिल्ली आणि मुंबईमध्ये एलपीजी सिलिंडरची (LPG cylinder) किंमत 899.50 रुपये आहे. तर कोलकात्यात तो 926 रुपये आहे. एलपीजीच्या (LPG) बाबतीत, कमी किंमतीच्या विक्रीतून होणारा तोटा प्रति सिलेंडर 100 रुपयांवर पोहोचला आहे.

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेल (Petrol-diesel) आणि सीएनजीच्या (CNG) किमतीत विक्रमी वाढ होत असताना, या महिन्यात सलग दुसऱ्यांदा स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या (Gas cylinder) किमती वाढण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात एलपीजी (LPG) सिलिंडरच्या किंमतीत वाढ होण्याचा अंदाज आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एलपीजीच्या बाबतीत, कमी किंमतीच्या विक्रीतून होणारा तोटा (अंडर रिकव्हरी) प्रति सिलेंडर 100 रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे त्याच्या किमतीत पुन्हा वाढ होऊ शकते. पण एलपीजी सिलिंडरची किंमत किती वाढणार, हे सरकारच्या परवानगीवर अवलंबून असेल. याआधी 6 ऑक्टोबर रोजी एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 15 रुपयांची वाढ करण्यात आली होती. जुलैपासून 14.2 किलो एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 90 रुपयांनी वाढ झाली आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम विपणन कंपन्यांना किरकोळ किंमतीशी जुळवून घेण्याची परवानगी दिलेली नाही. याशिवाय ही तफावत भरून काढण्यासाठी शासनाकडून आतापर्यंत कोणतेही अनुदान देण्यात आलेले नाही. आंतरराष्ट्रीय किमतीत झालेल्या वाढीमुळे एलपीजीच्या विक्रीतील तोटा 100 रुपये प्रति सिलेंडरवर गेला आहे.

सौदी अरेबियामध्ये एलपीजीचा दर या महिन्यात 60 टक्क्यांनी वाढून 800 डॉलर प्रति टन झाला आहे, तर आंतरराष्ट्रीय बेंचमार्क ब्रेंट क्रूड 85.42 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचला आहे. “एलपीजी सध्या एक नियमन केलेली वस्तू आहे. अशा परिस्थितीत, तांत्रिकदृष्ट्या सरकार त्याच्या किरकोळ किंमतीवर नियंत्रण ठेवू शकते. मात्र असे केल्याने सरकारला पेट्रोलियम कंपन्यांना किमतीपेक्षा कमी दराने विकून तोटा भरून काढावा लागणार आहे.

सध्या दिल्ली आणि मुंबईमध्ये एलपीजी सिलिंडरची किंमत 899.50 रुपये आहे. तर कोलकात्यात तो 926 रुपये आहे. देशातील पात्र कुटुंबांना त्याच दरात अनुदानित एलपीजी सिलिंडर मिळतात. एका वर्षात, त्यांना अनुदानित दरात प्रत्येकी 14.2 किलोचे 12 सिलिंडर मिळतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT