LPG Dainik Gomantak
अर्थविश्व

LPG Price Cylinder Price: महिन्याच्या पहिल्याच दिवशी आनंदाची बातमी, एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त; जाणून घ्या दर किती कमी झाले?

LPG Gas Cylinder Price Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल कंपन्यांनी ग्राहकांना आनंदाची बातमी दिली आहे. 1 मे रोजी एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे.

Manish Jadhav

LPG Gas Cylinder Price Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल कंपन्यांनी ग्राहकांना आनंदाची बातमी दिली आहे. 1 मे रोजी एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे.

कमर्श‍ियल गॅस सिलिंडरच्या किमतीतही कपात सरकारी तेल कंपन्यांनी (OMCs) केली आहे. यासोबतच जेट फ्लूटच्या किमतीतही कपात करण्यात आली आहे.

तेल विपणन कंपन्यांनी आज 19 किलोच्या कमर्श‍ियल एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत 172 रुपयांनी कपात केली आहे.

नवे दर 1 मेपासून लागू करण्यात आले

तेल कंपन्यांनी जेट इंधनाच्या (हवाई इंधन) किमतीत 2415 रुपयांपर्यंत कपात केली आहे. 1 मेपासून नवे दर लागू करण्यात आले आहेत.

मात्र, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत पूर्वी 2028 रुपयांना कमर्शियल गॅस सिलिंडर उपलब्ध होता, आता तो 1856.50 रुपयांना मिळणार आहे. त्याचप्रमाणे, कोलकातामध्ये (Kolkata) 2132 रुपयांना मिळणारा सिलेंडर आता 1960.50 रुपयांना मिळणार आहे.

मुंबई आणि चेन्नईचे दर

मुंबईबद्दल बोलायचे झाल्यास, आधी हा सिलेंडर 1980 रुपयांचा होता, तो आता 1808.50 रुपयांवर आला आहे.

त्याचवेळी, चेन्नईमध्ये 2192.50 रुपयांच्या सिलेंडरसाठी आता 2021.50 रुपये मोजावे लागतील. तेल विपणन कंपन्यांकडून एटीएफची किंमत 2415.25 रुपयांनी कमी करण्यात आली आहे.

पीक ट्रॅव्हल सीजनमध्ये किमती कमी झाल्यामुळे विमान कंपन्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे आगामी काळात विमान भाड्यात कपात होण्याची शक्यता आहे.

ATF च्या किमती

ATF ची किंमत दिल्लीत 95935.34 रुपये प्रति किलोलीटर, मुंबईत (Mumbai) 89348.60 रुपये प्रति किलोलीटर, कोलकातामध्ये 102596.20 रुपये आणि चेन्नईमध्ये 99828.54 रुपये प्रति किलोलीटरवर आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: काँग्रेससोबत 'आरजी'ची जागावाटपासाठी बैठक; 16 जागांचा प्रस्ताव, सासष्टीत जागेसाठी जोर

AI+ New Gadgets: भन्नाट फीचर्स अन् जबरदस्त परफॉर्मन्स! AI+ ने बाजारात आणली 3 नवी शक्तिशाली गॅजेट्स; काय आहेत वैशिष्ट्ये? किंमत किती?

खरी कुजबुज: काँग्रेसची वजाबाकी

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT