sbi.jpg 
अर्थविश्व

जुलै महिन्यात बँकेची कामे करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी वाचा

दैनिक गोमन्तक
नवी दिल्ली:जुलै(July) महिन्यात बँके(Bank) संबंधित काही काम असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. कारण जुलैमध्ये दोन किंवा चार दिवस नही तर चक्क 15 दिवस बॅंका बंद (Bank Holidays) राहणार आहेत.  म्हणजेच 30 पैकी 15 दिवस बँकामध्ये कोणतेही काम होणार नाही. म्हणून बँकेत जाण्यापूर्वी सुट्टीची यादी तुम्ही तपासून पहा. बँकांच्या सुट्टीची यादी आरबीआय(RBI) जारी करते. यामध्ये राज्यांनुसार बँकांना सुट्या दिल्या जातात. येत्या जुलै महिन्यात तर 15 दिवस बँका बंद राहणार असल्याने अनेकांची अडचण होऊ शकते.(List of bank holidays in July: Check here)
 
जुलै 2021 मध्ये बँकांना सणाच्या 9 सुट्ट्या आहेत. तर शनिवार व रविवारी अशा 6 सुट्ट्या आहेत म्हणजेच एकूण 15 दिवस बँकाबंद राहणार आहेत. पण जर 9 सुट्ट्या राज्यानुसार असतील तर सर्व बँका बंद राहणार नाहीत. कारण ज्या राज्यात ज्या सणाची सुट्टी असेल तिथल्याच बँका त्या दिवशी बंद राहतील. 

वॉरन बफेंनी बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनच्या विश्वस्त पदाचा दिला राजीनामा


 या सुट्ट्या नेमक्या कधी जाणून घेऊयात 

 4 जुलै 2021 - रविवार
 10 जुलै 2021 - दुसरा शनिवार
 11 जुलै 2021 - रविवार
 12 जुलै 2021 - सोमवार - कांग (राजस्थान), रथ यात्रा (भुवनेश्वर, इंफाळ,)
 13 जुलै 2021 - मंगळवार - भानु जयंती (शहीद दिन- जम्मू-काश्मीर, भानु जयंती- सिक्कीम)
 14 जुलै 2021 - द्रौकपा शेशिक उत्सव
 16 जुलै 2021 - गुरुवार - हरेला पूजा उत्सव  (डेहराडून )
 17 जुलै 2021 - खार्ची पूजा (अगरताला , शिलाँग)
 18 जुलै 2021 - रविवार
 19 जुलै 2021 - सोमवार 
 20 जुलै 2021 - मंगळवार - ईद अल अदा  (देशभर)
 21 जुलै 2021 - बुधवार - बकरी ईद (संपूर्ण देशभर)
24 जुलै 2021 - चौथा शनिवार
25 जुलै 2021 - रविवार
31 जुलै 2021 - शनिवार
तर या आहेत एकूण १५ सुट्ट्या ज्या जुलै महिन्यात येणार आहेत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Banners Goa: म्हापशात 'बॅनर पॉलिटिक्स'चा धुरळा! सत्ताधाऱ्यांचे फलक झळकतात, विरोधकांचे बॅनर रातोरात हटवतात

Most Expensive Iphone 18 Pro: आयफोन 18 प्रो चा लक्झरी अवतार, जगातील सर्वात अलिशान स्मार्टफोन लाँच; 'डार्क रेड' मॉडेलचा नवा जलवा

Goa Crime: पेडणे स्मशानभूमीत अज्ञाताचा कुजलेला मृतदेह! 4-5 दिवसांपूर्वी आणून ठेवल्याचा संशय; खुनाच्या शक्यतेने चतुर्थीत खळबळ

Goa Protests: गोव्यात पाच वर्षांत 42 आंदोलने; 2025 मध्ये सर्वाधिक 15! आंदोलनांशी संबंधित गुन्ह्यांत 2024 आघाडीवर, 7 एफआयआर दाखल

VIDEO: हवेतच विमानाचं टायर फुटलं, इंजिनमध्ये घुसले रबराचे तुकडे अन्..., इराणमध्ये बोइंग 737 चं थरारक इमर्जन्सी लँडिंग; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT