Indian Railways Night Journey Rules Dainik Gomantak
अर्थविश्व

रात्री प्रवास करण्यासाठी रेल्वेचा हा नियम घ्या जाणून; नाहीतर होईल नुकसान

रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्यांचा त्रास लक्षात घेऊन रेल्वेने काही नियमांमध्ये बदल केले आहेत.

दैनिक गोमन्तक

Indian Railways Night Journey Rules : तुम्हीही अनेकदा ट्रेनने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. वास्तविक, रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्यांचा त्रास लक्षात घेऊन रेल्वेने काही नियमांमध्ये बदल केले आहेत. ज्याचा थेट फायदा प्रवाशांना होणार आहे. अशा परिस्थितीत, घर सोडण्यापूर्वी, तुम्हाला या नियमांची माहिती असणे आवश्यक आहे. जर तुमच्याकडे माहिती नसेल तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. रेल्वेने केलेले नवे नियम विशेषत: रात्री प्रवास करणाऱ्यांना लागू होणार आहेत. (Know this rule of the train to travel at night)

रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्यांना त्रास होत असल्याच्या तक्रारी अनेकदा रेल्वे बोर्डाकडे येतात. हे लक्षात घेऊन नियमात बदल करण्यात आला आहे. यासाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहेत.

हा रेल्वेचा नियम

रेल्वेच्या या नियमानुसार रात्रीच्या वेळी प्रवास करताना कोणत्याही सहप्रवाशाला मोबाईलवर (Mobile) मोठ्याने बोलता येणार नाही. तसेच त्याला मोठ्या आवाजात गाणी ऐकायला मिळणार नाहीत. प्रवाशांच्या तक्रारी आल्यानंतर अशा लोकांवर कारवाई केली जाईल.

आवाज करणे किंवा मोठ्या आवाजात बोलणे इत्यादी तक्रारी आल्यास रेल्वे कर्मचाऱ्यांना (Railway Employees) घटनास्थळी जाऊन समस्या सोडवावी लागणार आहे. यावर तोडगा न निघाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी रेल्वे कर्मचाऱ्यांवर असेल. रेल्वे बोर्डाच्या वतीने सर्व झोनच्या महाव्यवस्थापकांना यासंदर्भात आदेश जारी करून नियमांची अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे.

प्रवाशांच्या तक्रारी

शेजारील सीटवर उपस्थित असलेल्या प्रवाशाच्या मोबाईलवर मोठ्याने बोलणे किंवा गाणे ऐकणे अशा प्रवाशांकडून अनेकदा तक्रारी येतात. काही गट मोठ्या आवाजात बोलत असून, त्यामुळे इतर प्रवाशांच्या झोपेचा त्रास होत असल्याचीही तक्रार आहे. रात्री दिवे लावतानाही अनेक वेळा वाद होतात. आता रेल्वे कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पोहोचून अशा समस्या सोडवाव्या लागणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

EPFO कडून पेन्शनधारकांसाठी मोठी खूशखबर! आता घरी बसून जमा करता येणार 'डिजिटल लाईफ सर्टिफिकेट'; जाणून घ्या पद्धत

Abhishek Sharma T20 Record: सिक्सर किंग अभिषेक शर्माची कमाल! पॉवरप्लेमध्ये 100 षटकार मारणारा ठरला जगातील पहिला फलंदाज; रोहित शर्माला सोडले मागे

Donald Trump Iran Jail: डोनाल्ड ट्रम्पला इराणनं तुरुंगात डांबलं? तेहरानमधील व्हायरल व्हिडिओनं जगात खळबळ; अमेरिकेच्या दादागिरीला चोख प्रत्युत्तर VIDEO

Codli Iron Ore Mine: कोडली खाण पुन्हा सुरू करण्यावर संमिश्र प्रतिक्रिया; रोजगाराची आशा, पण पाणी, शेती आणि प्रदूषणाची गंभीर चिंता

Made In India Smartphone Brand: ॲपल-सॅमसंगला देणार टक्कर! भारत 2028 पर्यंत लॉन्च करणार स्वतःचा स्मार्टफोन ब्रँड; केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT