Government Scheme Dainik Gomantak
अर्थविश्व

Government Scheme: तुमच्या मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी घ्या 'या' सरकारी योजनेचा लाभ

तुम्हाळ जर तुमच्या भविष्याची काळजी असेल तर या सरकारी योजनेत गुंतवणूक करावी.

दैनिक गोमन्तक

आज संपूर्ण जग मोठ्या उत्साहात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करत आहेत. हा दिवस महिला सक्षमीकरण म्हणून साजरा केला जातो. महिलांचा (Women) सामाजिक दर्जा सुधारण्यासाठी आणि त्यांना आर्थिक आणि समाजिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी सरकार विविध योजना आणत आहे. त्यापैकी एका योजनेचे (Scheme) नाव आहे सुकन्या समृद्धी योजना. आपल्या मुलीच्या जन्मानंतर प्रत्येक पालकांना तिच्या शिक्षणाची आणि लग्नाच्या खर्चाची चिंता असते. ही चिंता दूर करण्यासाठी सरकारने सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) सुरू केली आहे.

या योजनेअंतर्गत तुम्ही तुमच्या मुलीच्या नावाने पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडू शकता. हे पोस्ट ऑफिसच्या लहान बचत योजनेअंतर्गत येते. या योजनेद्वारे मुलीला भविष्यातील शिक्षण (Education) आणि लग्नासाठी पैसे (Money) मिळतात. हे तिला स्वतंत्र्य बनवण्यास सक्षम करते. चला तर मग जाणून घ्या या योजनेबद्दल अधिक माहिती.

* सुकन्या समृद्धी योजनेशी संबंधित माहिती

या योजनेमध्ये तुम्हाला प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 250 रुपयांची गुंतवणूक करणे आवश्यक आहे. लक्षात ठेवा की गुंतवणुकीची किमान रक्कम 50 च्या पटीत असावी. याच्या मदतीने तुम्ही जास्तीत जास्त आर्थिक वर्षात जास्तीत जास्त 105 लाखापर्यंत गुंतवणूक करू शकता. यासोबतच हे खाते 10 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलीच्या नावाने उघडले जाते. एका कुटुंबातील फक्त दोन मुलीनाच या योजनेचा लाभ मिळू शकतो. या योजने अंतर्गत जमा केलेली रक्कम मुलीच्या वयाच्या 18 व्या वर्षी काढता येईल. जर एखाद्या व्यक्तीला एकाच वेळी 3 मुले झाली असतील तर तो दोनपेक्षा अधिक खाते उघडू शकतो. या योजनेत गुंतवणूक केल्यानंतरच काढता येईल.

* सुकन्या समृद्धी योजनेच्या मॅच्युरिटीवर लाभ उपलब्ध

मुलीच्या 21 व्या वर्षी तुम्ही जमा झालेली रक्कम व्याजासह काढू शकता. त्यापूर्वी 18 व्या वर्षी 50 टक्के रक्कम काढत येते. मुलीच्या सहमतीने हे पैसे काढता येतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT