SHIRDI & JYOTIRLINGA YATRA Dainik Gomantak
अर्थविश्व

IRCTCसोबत शिर्डीसह करा 12 ज्योतिर्लिंगाची तिर्थयात्रा, 18,450 मध्ये 11 दिवसांचा टूर

देशात सध्या पावसामुळे पर्यटनाला उधाण आले आहे. निसर्ग प्रेमींची गडकिल्ले फिरायला जाण्याची धूम सुरू झाली आहे.

दैनिक गोमन्तक

देशात सध्या पावसामुळे पर्यटनाला उधाण आले आहे. निसर्ग प्रेमींची गडकिल्ले फिरायला जाण्याची धूम सुरू झाली आहे. अशातच धार्मिक यात्रेला जाऊ इच्छिणाऱ्या यात्रेकरूंसाठी सुद्धा एक आनंदाची बातमी आहे. IRCTC या भारतीय रेल्वेच्या उपक्रमाने शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनापासून ते 12 ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी नवीन पॅकेज सुरू केले आहे. ही तिर्थयात्रा 10 ऑक्टोबर 2022 रोजी दरभंगा स्टेशनपासून सुरू होईल. या टूर पॅकेजला शिर्डी आणि ज्योतिर्लिंग यात्रा (SHIRDI & JYOTIRLINGA YATRA EZSD02) असे नाव देण्यात आले.

18,450 रुपये प्रति व्यक्ती पासून सुरू होणारे

हे IRCTC टूर पॅकेज 11 दिवस आणि 10 रात्रीचे असेल. या टूर पॅकेजमध्ये प्रवाशांना थर्ड एसी आणि स्लीपरमध्ये प्रवास करता येणार आहे. या टूर पॅकेज अंतर्गत 10 ऑक्टोबर 2022 रोजी दरभंगा येथून दुपारी 4 वाजता एक विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहे. या स्पेशल ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी दरभंगा, मुझफ्फरपूर आणि पाटलीपुत्र स्थानकांवरून प्रवासी चढू शकतील. या यात्रेच्या प्रवासाचे भाडे 18,450 रुपये प्रति व्यक्ती पासून सुरू होते. पॅकेजच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, कम्फर्ट क्लासमध्ये प्रति व्यक्ती 29,620 रुपये आहे तर मानक वर्गात प्रति व्यक्ती 18,450 रुपये असणार आहे.

टूर पॅकेज 10 रात्र आणि 11 दिवसांचे असेल

डेस्टिनेशन कव्हर - उज्जैन (महाकालेश्वर ज्योतिर्लिंग आणि ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग), द्वारका (द्वारकाधीश मंदिर आणि नागेश्वर ज्योतिर्लिंग), सोमनाथ (सोमनाथ ज्योतिर्लिंग) आणि मनमाड.

(शिरडी साईं दर्शन आणि त्र्यम्बकेश्वर ज्योर्तिलिंग)

पॅकेडचं नाव– SHIRDI & JYOTIRLINGA YATRA (EZSD02)

क्लास- स्लीपर आणि थर्ड एसी

जेवण योजना - नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण

निघण्याची तारीख - 10 ऑक्टोबर 2022

बुकिंग कसे करावे

प्रवासी या टूर पॅकेजसाठी IRCTC वेबसाइट www.irctctourism.com ऑनलाइन भेट देऊन बुकिंग करू शकतात. याशिवाय आयआरसीटीसी टुरिस्ट फॅसिलिटेशन सेंटर, झोनल ऑफिस आणि रिजनल ऑफिसमधूनही बुकिंग करता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT