Indian Railway Danik Gomantak
अर्थविश्व

रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगचे बदलले नियम

नवीन नियमानुसार ट्रेनचे तिकीट कसे बुक करावे

दैनिक गोमन्तक

इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या प्रक्रियेत सुधारणा केली आहे. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, आता तिकीट बुक करण्यासाठी लोकांना आणखी काही प्रक्रियेतून जावे लागणार आहे. आता वापरकर्त्यांना IRCTC अॅपवरून तिकीट बुक करताना फोन नंबर आणि ईमेल आयडी टाकणे बंधन कारक असणार आहे.

या संदर्भात, IRCTC ने प्रवाशांना आधीच अलर्ट केले आहे की 'पडताळणी प्रक्रिये'शिवाय कोणताही प्रवासी तिकीट बुक करू शकणार नाही. तिकिट बुक करण्यापूर्वी मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीची पडताळणी करण्याची प्रक्रिया करावी लागेल. अहवालात असेही म्हटले आहे की, नवीन नियम ज्यांनी कोविड-19 महामारी सुरू झाल्यापासून ऑनलाइन तिकिटे बुक केलेली नाहीत त्यांनाही लागू होतात.

जर तुम्हाला IRCTC अॅपद्वारे ट्रेनचे तिकीट बुक करायचे असेल तर तुम्हाला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर देखील टाकणे बंधन कारक असणार आहे. IRCTC अॅप किंवा वेबसाइटद्वारे ट्रेनचे तिकीट बुक करण्यासाठी तुम्ही फोन नंबर आणि ईमेल आयडीची पडताळणी कशी करू शकता.

IRCTC अॅप वरून फोन नंबर आणि ईमेल आयडी

सर्वप्रथम तुम्हाला IRCTC वेबसाइट किंवा अॅपवर जावे लागेल.

त्यानंतर विंडोज व्हेरिफिकेशनवर जा.

यानंतर तुम्ही नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी टाका.

आता या दोन बॉक्सच्या बाहेर उजव्या बाजूला पडताळणी बटण आणि डाव्या बाजूला संपादन बटण दिसेल.

तपशील प्रविष्ट केल्यानंतर मेल आणि फोन नंबरवर एक OTP येईल.

यानंतर, तुम्ही मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकून त्याची पडताळणी करू शकाल.

पडताळणीनंतर ट्रेनचे तिकीट कसे बुक करावे

IRCTC अॅप आणि वेबसाइटवर जा.

त्यानंतर युजर नेम आणि पासवर्डने लॉग इन करा.

आता स्त्रोत स्टेशन, गंतव्यस्थान, प्रवासाची तारीख आणि इतर तपशील प्रविष्ट करा.

त्यानंतर तुम्ही ट्रेन निवडा आणि 'Book Now' वर क्लिक करा.

आता प्रवाशाचे नाव, वय, लिंग, जन्म आणि इतर तपशील भरा.

आता पेमेंट मोड पर्याय निवडून तिकीट शुल्क भरा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'वीरेश बोरकरांनी चोडणकरांकडून तीन कोटी घेतले', अजय खोलकरांच्या आरोपाने गोव्यात खळबळ; 'आरजी'तील अंतर्गत कलह विकोपाला

Kannada Remark Controversy: मुख्यमंत्र्यांच्या 'कानडी' वक्तव्यावरुन कुठ्ठाळीत रणकंदन; भाजप-काँग्रेसमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप! मारियानो रॉड्रिग्ज आक्रमक

Goa Stray Dogs: भटक्या कुत्र्यांच्या व्यवस्थापनात कुचराई! पालिकांना कोर्टाचा दणका; अधिकाऱ्यांवर शिस्तभंग कारवाईचे आदेश

Rohit Sharma T20 Comeback: '2027 च्या वर्ल्ड कपनंतर टी-20 क्रिकेटमध्ये कमबॅक!' रोहित शर्माच्या विधानाने चर्चेला उधाण, हिटमॅन नेमकं काय म्हणाला? Watch Video

Generations History: सायलेंट जनरेशन, बेबी बूमर्स ते जेन झी आणि अल्फा; बदलत्या पिढ्यांचा रंजक इतिहास अन् तरुण पिढीचा डिजिटल उठाव!

SCROLL FOR NEXT