Instagram  Dainik Gomantak
अर्थविश्व

Instagram Reels: Instagram कडून यूजर्ससाठी खास दिवाळी ऑफर, रील बनवून कमवा लाखो रुपये

Instagram Features: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram हळूहळू फोटो शेअरिंग पर्यायांपेक्षा लहान व्हिडिओंवर अधिक लक्ष केंद्रित करत आहे.

दैनिक गोमन्तक

How To Earn Money From Instagram: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram हळूहळू फोटो शेअरिंग पर्यायांपेक्षा लहान व्हिडिओंवर अधिक लक्ष केंद्रित करत आहे. गेल्या 2 वर्षात कंपनीने यावर पूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. आणि त्यात अनेक नवीन फीचर्स देखील जोडले गेले आहेत. Tiktok शी स्पर्धा करण्यासाठी कंपनी अधिकाधिक युजर्संना लहान व्हिडिओंकडे आणू इच्छिते. यासाठी ते त्यांना कमाईची ऑफरही देत ​​आहेत. आता कमाई दरम्यान, कंपनीने दिवाळीच्या खास प्रसंगी अतिरिक्त कमाई करण्याची ऑफर आणली आहे. कंपनीच्या या ऑफरबद्दल आणि त्याद्वारे तुम्ही अतिरिक्त पैसे कसे कमवू शकता, चल तर मग जाणून घेऊया...

ही कंपनीची नवीन ऑफर आहे

Meta ने भारतात या प्लॅटफॉर्मसाठी Reels Play बोनस ऑफर देखील लाँच केली आहे. या ऑफर अंतर्गत व्हिडिओ बनवणाऱ्या युजर्सना $5000 पर्यंत ( Around Rs.4 Lakhs) बोनस मिळेल. आतापर्यंत ही ऑफर फक्त यूएसमध्येच (USA) चालत होती, पण आता ती इंडियन कन्टेट क्रिएटर्ससाठीही जारी करण्यात आली आहे. या शानदार ऑफरमुळे, इंडियन कन्टेट क्रिएटर्स आता ब्रॅंड स्पॉन्सरशिप आणि एफिलिएट कार्यक्रमांव्यतिरिक्त थेट मेटामधून पैसे कमविण्याची संधी मिळेल. ही ऑफर सादर केल्यानंतर, Instagram आता वापरकर्त्यांना अधिकाधिक रील बनवण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. कंपनीला लहान व्हिडिओ प्लॅटफॉर्मच्या बाबतीत टिकटॉकला (TikTok) मागे सोडायचे आहे.

या ऑफर अंतर्गत

या ऑफर अंतर्गत रील बनवल्यानंतर बोनस नंबर ऑफ प्ले वर अवलंबून असेल. यामध्ये प्ले 165M पर्यंत मोजले जाईल. बोनससाठी 150 पर्यंत रील आवश्यक आहेत. एकदा सुरु केल्यानंतर, वापरकर्त्याकडे कमाल बोनससाठी 1 महिन्यापर्यंतचा कालावधी असेल. 11 नोव्हेंबर 2022 पूर्वी बोनस सक्रिय केला जाऊ शकतो. एलिजिबल क्रिएटर्स रील्समधून पैसे कमवू शकतात, जेव्हा त्यांच्या रीलला गेल्या 30 दिवसांत 1000 व्ह्यूज मिळाले आहेत. एकूणच, रील क्रिएटर्संना आत्ता लाखो बोनस मिळवण्याची उत्तम संधी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशी दिवशी 5 ग्रहांचा महायोग, 'या' राशींना मिळणार बंपर लाभ

Paliem: कुळवाड्यांनी शेकडो वर्षांपूर्वी भूमातेची पूजा आरंभली! निसर्गसंपन्न 'पालये' गाव; भोम येथील महाकाय वटवृक्ष

Opinion: प्लेटो दाखवून देतो, ‘लोकशाही’ शहाणपणापेक्षा ‘लोकप्रिय’ मताला प्राधान्य देऊन, हुकूमशाहीचा मार्ग सुकर करते

Ashadhi Ekadashi: ..जातां पंढरीसी सुख वाटे जीवा। गोव्यातील लाखो वारकऱ्यांनी गाठले पंढरपूर

Sanguem Rathotsav: विठ्ठल, विठ्ठल! सांगेत भाविकांचा पूर, रथोत्सवानिमित्त होणार विठूनामाचा गजर

SCROLL FOR NEXT