Innova Hycross Toyota Twitter
अर्थविश्व

Innova Hycross: इनोव्हा हायक्रॉस! इलेक्ट्रिक चार्जिंगसह पेट्रोलवरही धावणार, जाणून घ्या फिचर्स & किंमत

जानेवारी 2023 पासून कारचे वितरण सुरू होणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Innova Hycross: ऑटोमोबाईल क्षेत्रातील दिग्गज इनोव्हाने इलेक्ट्रिक चार्जिंगसह पेट्रोलवर चालणारी हायब्रीड कार इनोव्हा हायक्रॉस लॉन्च (Innova Hycross Car launched) केली आहे. लक्झरी सेगमेंट कार इनोव्हा हायक्रॉसचे बुकिंग गेल्या नोव्हेंबरपासून सुरू झाले आहे. जानेवारी 2023 पासून कारचे वितरण सुरू होणार आहे.

Innova Hycross

टोयोटाने बुधवारी बहुउद्देशीय लक्झरी इनोव्हा हायक्रॉसची नवीन हायब्रीड कार लॉन्च केली. कंपनीने गेल्या नोव्हेंबरमध्ये कारचे अनावरण केले होते. इलेक्ट्रिक चार्जिंगसह पेट्रोलवर चालणाऱ्या इनोव्हा हायक्रॉस कारचे ग्राहकांना मोठे आकर्षण निर्माण झाले आहे. इनोव्हा हायक्रॉस ही सेल्फ-चार्जिंग मजबूत हायब्रिड इलेक्ट्रिक सिस्टम असलेली कार आहे. यात 2-लिटर पेट्रोल इंजिनसह ई-ड्राइव्ह शिफ्ट प्रणाली आहे. त्याच्या मदतीने, लक्झरी कार इलेक्ट्रिक चार्जिंगवर चालविली जाऊ शकते आणि आवश्यक असल्यास ऑटोमॅटिक ट्रान्समिशनद्वारे पेट्रोलमध्ये बदलू शकते.

Innova Hycross

कंपनीने इनोव्हा हायक्रॉसची एक्स-शोरूम किंमत 18.30 लाख रुपये ठेवली आहे. कारच्या सेल्फ-चार्जिंग हायब्रीड कारची किंमत 24.01 ते 28.97 लाख रुपयांपर्यंत (Innova Hycross Car launched) आहे. तर, पेट्रोल व्हर्जनची किंमत 18.30 ते 19.20 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

इनोव्हा 2005 मध्ये लॉन्च करण्यात आली होती आणि आतापर्यंत 10 लाखांहून अधिक युनिट्स विकल्या गेल्या आहेत. आता नवीन हायब्रीड कार बाजारात दाखल झाली आहे. त्यालाही ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Suryakumar Yadav Dance: सूर्याचा 'धुरंधर' अवतार! अक्षय खन्नाच्या 'सिग्नेचर' स्टेपवर धरला ठेका; धमाकेदार डान्सवर चाहते फिदा VIDEO

Iran War: इराणी ड्रोनचा अचूक वेध अन् कुवेतच्या स्वप्नांचा चुराडा! 'डिसॅलिनेशन प्लॅंट'वर केला भीषण हल्ला; 90 टक्के पाणीपुरवठा धोक्यात

Goa Crime: कुटुंबीयांकडून घाईघाईत अंत्यविधीची तयारी, पण... KTC बस स्थानक परिसरात खळबळ; झोपडपट्टीत राहणाऱ्या व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू

Leopard in Camurlim: कामुर्लीत बिबट्याचा वावर; वासराची शिकार केल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

Horoscope: एप्रिल 2026 मध्ये कोणाला मिळणार कुटुंबाची साथ? कोणाची होणार ताटातूट? जाणून घ्या 12 राशींचे भविष्य

SCROLL FOR NEXT