Google pay Daily Transaction Limit  Dainik Gomantak
अर्थविश्व

आर्थिक व्यवहार करण्यासाठी Google Payची रोजची मर्यादा किती? जाणून घ्या

Google Pay सह सर्व UPI अॅप्सद्वारे, आपण एका दिवसात जास्तीत जास्त 1,00,000 रुपये पाठवू शकतो.

दैनिक गोमन्तक

गुगल पे (Google Pay), फोन पे (PhonePe) सारख्या अनेक व्यवहार अॅप्सनी पैशांचे व्यवहार खूप सोपे केले आहेत. कुणाला पैसे पाठवायचे असोत किंवा दुकानातील वस्तूंच्या बदल्यात पैसे द्यायचे असोत, या अॅप्सच्या माध्यमातून डोळ्यांदेखत पटकन ऑनलाईन व्यवहार (Online Payment) होतात.

या अॅप्सची स्वतःची मर्यादा असली तरी आणि ती मर्यादा गाठल्यावर व्यवहार करता येत नाहीत आणि माहितीच्या अभावामुळे अनेकांना आपल्या अॅपमध्ये किंवा बँकेच्या सर्व्हरमध्ये समस्या असल्याचे जाणवते. Google Pay च्या दैनंदिन (दैनिक) आणि मासिक मर्यादेबद्दल आणि दररोज आपण किती पैसे पाठवू आणि प्राप्त करू शकतो हे जाणून घेऊया. (Information about Google pay Daily Transaction Limit)

जरी बँकानुसार मर्यादा बदलत असली तरी, Google Pay सह सर्व UPI अॅप्सद्वारे, आपण एका दिवसात जास्तीत जास्त 1,00,000 रुपये पाठवू शकतो. आपण या सर्व UPI अॅप्सद्वारे दिवसातून 10 वेळा पैसे पाठवू शकतो.

आपल्याला एखाद्याकडून पैशांची विनंती करायची असल्यास, आपण जास्तीत जास्त 2,000 रुपयांची विनंती पाठवू शकतो. जर 1 लाख रुपयांपेक्षा जास्त किंवा 10 पेक्षा जास्त वेळा पैशांचे व्यवहार करायचे असतील तर दुसऱ्या दिवसाची वाट पाहावी लागेल.

अशा परिस्थितीत जर दैनंदिन व्यवहार तुमच्या UPI मर्यादेपेक्षा कमी असेल तर तुम्ही दुसरे बँक खाते वापरू शकता. वास्तविक, बँकांच्याही स्वत:च्या वेगळ्या मर्यादा असतात. Google Pay द्वारे एका दिवसात जास्तीत जास्त 1 लाख रुपये पाठवू शकतो, परंतु बँकेने तुमच्या खात्यावर 25 हजार रुपयांची मर्यादा टाकली आहे, तर Google Pay किंवा इतर कोणत्याही UPI अॅपद्वारे जास्त पैसे पाठवू शकणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT