Vande Bharat Train Dainik Gomantak
अर्थविश्व

Indian Railways: वंदे भारतच्या प्रवाशांसाठी मोठी बातमी, रेल्वेमंत्र्यांनी केली 'ही' घोषणा

Indian Railways Boundary Wall: भारतीय रेल्वेकडून प्रवाशांची सोय लक्षात घेऊन आवश्यक कामे केली जात आहेत.

दैनिक गोमन्तक

Indian Railways Boundary Wall: भारतीय रेल्वेकडून प्रवाशांची सोय लक्षात घेऊन आवश्यक कामे केली जात आहेत. प्रवाशांचा प्रवास सोयीस्कर करण्यासाठी रेल्वेने 15 ऑगस्ट 2023 पर्यंत देशात 75 वंदे भारत गाड्या चालवण्याची तयारी केली आहे. यावर वेगाने काम सुरु असून, सध्या देशात 5 वंदे भारत गाड्या सुरु आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून वंदे भारत सेमी हायस्पीड ट्रेनच्या अपघातांमुळे प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागले. त्यामुळे गाडी गंतव्यस्थानावर उशिराने पोहोचली.

रेल्वे ट्रॅकपासून दूर ठेवण्याचा उद्देश

हे अपघात (Accident) लक्षात घेऊन बाउंड्री वॉलच्या सुधारित डिझाइनला रेल्वे मंत्रालयाने नुकतीच मान्यता दिली आहे. या आराखड्याला मंजुरी देण्यामागचा उद्देश जनावरांना रेल्वे ट्रॅकपासून दूर ठेवण्याचा आहे. यासंदर्भात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, येत्या पाच ते सहा महिन्यांत नवीन बाउंड्री वॉल तयार होईल.

पाच ते सहा महिन्यांत तयार होईल

रेल्वे मंत्र्यांनी सांगितले की, ट्रेनचा अपघात टाळण्यासाठी बाउंड्री वॉलच्या नव्या डिझाइनला परवानगी देण्यात आली आहे. येत्या पाच ते सहा महिन्यांत ते तयार होईल. नुकतेच 29 ऑक्टोबर रोजी मुंबईतील (Mumbai) अतुल येथे एका प्राण्याला धडकल्याने वंदे भारत ट्रेन 15 मिनिटे उशिराने धावली होती. रेल्वेच्या मध्य विभागात हा अपघात झाला.

अपघातामुळे ट्रेन 15 मिनिटे उशिराने

अपघातग्रस्त वंदे भारत ही गाडी मुंबईहून गांधीनगरकडे जात असताना अपघात झाला. वाटेत झालेल्या या अपघातामुळे गाडी 15 मिनिटे उशिराने धावली. यापूर्वी 7 ऑक्टोबरला वंदे भारत ट्रेनसोबत अशीच घटना घडली होती. त्यावेळीही गाडी मुंबई सेंट्रलहून गांधीनगरकडे जात होती. वाटवा ते मणिनगर स्थानकादरम्यान ही दुर्घटना घडली.

काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, रेल्वे मंत्रालयाने अशी ठिकाणे चिन्हांकित केली आहेत, जिथे प्राणी येण्याची शक्यता जास्त आहे. त्या ठिकाणी 100 किलोमीटर लांबीची बाउंड्री वॉल बांधण्यात येणार आहे. एका आकडेवारीनुसार, ऑक्टोबरच्या पहिल्या नऊ दिवसांत जनावरांच्या गर्दीमुळे 200 गाड्यांवर परिणाम झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT