Ashwini Vaishnaw Dainik Gomantak
अर्थविश्व

Indian Railways: 2024 च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा! तुम्हीही म्हणाल...

Ashwini Vaishnaw: रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या वतीने लवकरच आणखी एक नवीन ट्रेन कार्यान्वित करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली.

दैनिक गोमन्तक

Kashi Tamil Sangamam Express: तुम्हालाही ट्रेनने प्रवास करायला आवडत असेल, तर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची ही घोषणा तुम्हाला आनंद देईल. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या वतीने लवकरच आणखी एक नवीन ट्रेन कार्यान्वित करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. 'काशी तामिळ संगमम एक्सप्रेस' नावाची नवीन ट्रेन काशी आणि तामिळनाडू दरम्यान धावणार आहे. तामिळनाडूतील प्रतिनिधींना संबोधित करताना त्यांनी ही घोषणा केली. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नव्या ट्रेनची घोषणा करण्यात आल्याचे मानले जात आहे.

रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास योजनेचा आढावा घेतला

ही ट्रेन सुरु झाल्यास दक्षिण भारतातून (South India) बनारसला येणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे. रेल्वेमंत्र्यांच्या या घोषणेने सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने गुंजू लागले. शुक्रवारी रात्री बनारसला पोहोचलेल्या रेल्वेमंत्र्यांनी वाराणसी जंक्शनच्या पुनर्विकास योजनेचाही आढावा घेतला.

बनारस रेल्वे स्थानकावर 7000 कोटी रुपये खर्च केले

अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, 'प्रवाशांसाठी लवकरच नवीन ट्रेन सुरु करण्यात येणार आहे.' दरम्यान, वाराणसी जंक्शनच्या पुनर्विकास योजनेचा आढावा घेताना रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, 'भविष्यात प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन हे स्थानक तयार केले जात आहे.' आगामी काळात वाराणसी (Varanasi) जंक्शन हे जागतिक दर्जाचे स्थानक असेल, असेही ते म्हणाले. हा PM मोदींच्या व्हिजनचा भाग असेल, ज्यामध्ये रेल्वे स्टेशनला विमानतळ टर्मिनलसारखे बनवण्याचा विचार करण्यात आला आहे. जगातील निवडक रेल्वे स्थानकात बनारस रेल्वे स्थानकाचा समावेश करण्यासाठी 7000 कोटी रुपये खर्च करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

स्लीपर वंदे भारत लवकरच रुळावर धावणार आहे

पुढील 50 वर्षांचे नियोजन लक्षात घेऊन स्टेशन तयार केले जात आहे. आगामी काळात वाराणसी रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा ताण वाढणार आहे. आधुनिक सुविधांसह स्लीपर वंदे भारत लवकरच प्रवाशांसाठी उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तामिळनाडूहून काशीला पोहोचलेल्या टीमने अश्विनी वैष्णव यांच्यासोबत त्यांचा अनुभव शेअर केला. त्यांनी रेल्वे मंत्रालय आणि IRCTC च्या टीमचे कौतुक केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Narendra Modi Goa Visit: मोदींची दिवाळी यावर्षी 'गोव्यात'! नौदल जवानांसोबत उत्‍सव करणार साजरा; ‘ऑपरेशन सिंदूर’च्या आठवणींना उजाळा

Mhaje Ghar: ...तर ‘माझे घर’ योजनेचे लाभार्थी पडतील त्रासात! विरियातोंचा गंभीर इशारा; सरकारच्‍या धोरणांवर साधला निशाणा

Goa Politics: खरी कुजबुज; रवींच्‍या व्‍हिजनवर गोविंदांची वाटचाल

Goa Education: 'यापुढे कठीण प्रश्‍‍नपत्रिका न देण्‍यावर भर देऊ'! तिसरीच्या प्रश्नपत्रिकेवरून गोंधळ, SCERT संचालकांचे प्रतिपादन

Who After Ravi Naik: फोंड्यातील पोटनिवडणुकीवरून भाजपसमोर पेच! रवी नाईक यांचे कनिष्‍ठ सुपुत्र 'रॉय' यांच्या नावाचाही आग्रह

SCROLL FOR NEXT