Indian Railway Dainik Gomantak
अर्थविश्व

Indian Railways: रेल्वेचा इशारा! प्रवासादरम्यान ही चूक झाल्यास 3 वर्षांच्या तुरुंगवासासह...

Indian Railways Alert: रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे.

दैनिक गोमन्तक

Indian Railways Alert: रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तुम्हीही सणासुदीत रेल्वेने प्रवास करत असाल तर रेल्वेने दिलेला इशारा नक्की जाणून घ्या. रेल्वे प्रवासाबाबत भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी अलर्ट जारी केला आहे. सणासुदीच्या काळात ट्रेनमधील गर्दी वाढत आहे. ट्रेनमध्ये आग लागण्याचे किंवा अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेता रेल्वेने प्रवाशांसाठी एक आदेश जारी केला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी रेल्वेने हा कडकपणा दाखवला आहे.

असे रेल्वेने सांगितले

याची माहिती रेल्वेने सोशल मीडियावर (Social Media) दिली आहे. ट्रेनमध्ये प्रवास करताना प्रवाशांनी (Passengers) ज्वलनशील सामग्री घेऊन प्रवास करु नये, हा दंडनीय गुन्हा असल्याचे रेल्वेने म्हटले आहे. असे केल्यास तुरुंगवासही होऊ शकतो. पश्चिम मध्य रेल्वेच्या म्हणण्यानुसार, ट्रेनमध्ये ज्वलनशील वस्तू ठेवणे हा रेल्वे कायदा, 1989 च्या कलम 164 नुसार दंडनीय गुन्हा आहे.

दुसरीकडे, या कायद्यातर्गंत या वस्तूंसह पकडलेल्या व्यक्तीला तीन वर्षांपर्यंत कारावास किंवा एक हजार रुपयांपर्यंतचा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. रॉकेल, पेट्रोल, फटाके आणि गॅस सिलिंडर इत्यादी ज्वलनशील पदार्थ सोबत ठेवू नका किंवा ट्रेनमध्ये प्रवास करताना ते कोणालाही घेऊन जाऊ देऊ नका, हा दंडनीय गुन्हा आहे.

या गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे

रेल्वेच्या म्हणण्यानुसार, आता प्रवाशांना रॉकेल, स्टोव्ह, पेट्रोल, गॅस सिलेंडर, माचिस, फटाके किंवा इतर कोणतीही ज्वलनशील वस्तू घेऊन प्रवास करता येणार नाही. प्रवाशांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी रेल्वेने हा कडकपणा दाखवला आहे. यासाठी रेल्वेने प्रवाशांना कडक इशारा दिला आहे.

रेल्वेच्या परिसरात धूम्रपान करणे हा गुन्हा आहे

याशिवाय, आगीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी रेल्वेने आखलेल्या योजनेंतर्गत ट्रेनमध्ये कोणी धूम्रपान करताना पकडले तर त्याला 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. याशिवाय दंडही भरावा लागू शकतो. रेल्वेच्या आवारात सिगारेट/बिडी ओढणे हा देखील दंडनीय गुन्हा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT